शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

उजनीतून चार हजार क्युसेकने सोडले पाणी; कार्तिकी एकादशीला भाविकांचे होणार स्नान

By काशिनाथ वाघमारे | Updated: November 19, 2023 14:08 IST

या पाण्याचा उपयोग २३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीला पंढरपूरला येणा-या भाविकांबरोबरच भीमा नदी काठावरील गावांसाठी पाणीपुरवठा योजनांसाठीही होणार आहे.

काशिनाथ वाघमारे, सोलापूर : पंढरपूर येथील कार्तिकी एकादशीला येणा-या भाविकांसाठी उजनी धरणातून चार हजार क्युसेकने भीमेत पाणी सोडण्यात आले आहे. शनिवार १८ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता उजनीतून भीमा नदीत दोन हजार क्यूसेकने पाणी सोडण्यास प्रारंभ करण्यात आला. त्यात रविवारी वाढ करून धरणाच्या दरवाज्यातून २४०० क्युसेक व विद्युत प्रकल्पाद्वारे १६०० क्युसेक असे एकूण ४००० क्युसेकने भीमा नदीपत्रात पाणी सोडण्यात येत आहे. हा प्रवाह २२ नोव्हेंबर पर्यंत चालू राहणार आहे. त्यासाठी धरणातील अंदाजे दीड टीएमसी पाण्याचा वापर होणार असल्याचे उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रशांत माने यांनी सांगितले.

या पाण्याचा उपयोग २३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीला पंढरपूरला येणा-या भाविकांबरोबरच भीमा नदी काठावरील गावांसाठी पाणीपुरवठा योजनांसाठीही होणार आहे. मागील वर्षी याच तारखेला धरणातील एकूण जलसाठा १२३.२८ टीएमसी तर उपयुक्त जलसाठा ५९.६२ टिएमसी एवढा होता. टक्केवारी १११.२८ होती. मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी ३६.८९ टीएमसी साठा कमी आहे.धरणाची सद्यस्थिती :* एकूण पाणीपातळी : ४९३.८८० मिटर* एकूण जलसाठा : ८६.३९ टीएमसी* उपयुक्त जलसाठा : २२.७३ टीएमसी* टक्केवारी : ४२.४३आऊट फ्लो* सीना माढा उपसा : ३३३ क्युसेक* दहिगाव उपसा : १२० क्युसेक* बोगदा : ९०० क्युसेक* मुख्य कालवा : २४०० क्युसेक* विद्युत प्रकल्प : १६०० क्युसेक

टॅग्स :Ujine Damउजनी धरणPandharpurपंढरपूर