शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
5
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
6
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
7
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
8
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
9
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
10
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
11
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
12
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
13
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
14
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
15
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
16
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
17
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
18
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
19
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
20
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"

सांगोल्यात चार लाखांची चोरी

By admin | Updated: June 15, 2014 00:46 IST

मुद्देमाल माण नदीत; चोरटे फरार

सांगोला : मामाच्या घरी पाहुणे म्हणून आलेल्या भाचाच्या उशाखाली ठेवलेली ४ लाख ५ हजार रुपयांची रोख रक्कम, रिव्हॉल्व्हर, एटीएम कार्ड अशा मुद्देमालांची सुटकेस चोरून नेली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास बलवडी (ता. सांगोला) येथे घडली. इंदौर-मध्यप्रदेश (रा. श्रीराम तलावली धार रोड) येथील उदयसिंह प्रतापराव खुटाळ यांचा कन्स्ट्रक्शन कंपनीचा व्यवसाय आहे. त्यांचे बलवडी (ता. सांगोला) येथील युवराज उर्फ रावसाहेब विजयसिंह लिगाडे नात्याने मामा आहेत. शुक्रवार, १३ जून रोजी उदयसिंह खुटाळ मामाकडे आले होते. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद घराची कडी काढून ठेकेदार उदयसिंह खुटाळ यांच्या उशाखाली ठेवलेले ४ लाख ५ हजार रूपये, सहा जिवंत काडतूस असलेले रिव्हॉल्व्हर, पॅनकार्ड, आठ विविध बँकांचे एटीएम कार्ड, कोरे चेकबुक अशी एकत्रित कागदपत्रे असलेली सुटकेस घेऊन चोरट्याने पोबारा केला.उदयसिंह खुटाळ शनिवारी सकाळी झोपेतून उठल्यानंतर त्यांना सुटकेस चोरीला गेल्याचे समजले. या घटनेची माहिती पो.नि. दयानंद गावडे यांना समजताच त्यांनी स.पो.नि. महादेव कुंभार व पोलीस कर्मचाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी पाठवून दिले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून जागेचा पंचनामा केला. पोलिसांनी तत्काळ सोलापूर येथून श्वान पथक व ठसे तज्ज्ञास पाचारण केले. दुपारपर्यंत पोलिसांच्या मदतीने श्वान पथक माग घेत असताना चोरीस गेलेली पैशाची सुटकेस माण नदीच्या पात्रात सापडली. पोलिसांनी पंचांसमक्ष सुटकेसमधील रकमेची मोजदाद केली असता सुटकेसमधील ४ लाख ५ हजार रूपयांपैकी ४० हजार रूपये कमी असल्याचे आढळून आले आहे. तर रिव्हॉल्व्हर व इतर कागदपत्रे सुरक्षित असल्याचे सांगितले. उदयसिंह प्रतापराव खुटाळ यांनी अज्ञात चोरट्याविरूध्द पोलिसात फिर्याद दिली असून, तपास स.पो.नि. महादेव कुंभार करीत आहेत. --------------------------------------पोलिसांनी सोडला सुटकेचा निश्वास४चोरीच्या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी मागविलेल्या श्वान पथकाच्या मदतीने चोरीस गेलेल्या मुद्देमालांची सुटकेस नजीकच्या नदी पात्रात सापडल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.