शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

नागेश गाढवे खून प्रकरणी चार फरार आरोपींना अटक

By admin | Updated: June 16, 2014 01:19 IST

सूत्रधारांच्या अटकेसाठी तहसीलवर मोर्चा

बार्शी : येथील आझाद चौकात नागेश गाढवे या युवकाच्या खुनामधील मुख्य सूत्रधारांना, फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी गाढवे कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवारांच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन दिले़ दरम्यान मोर्चादिवशीच फरार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे़ शनिवार, दि. ३१ मे रोजी नागेश गाढवे याचा तावडी हद्दीत गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी सोमनाथ गाढवे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिनेश कोरे या युवकास ताब्यात घेऊन अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासात प्रशांत उर्फ प्रवीण नवनाथ रिकिबे, अमोल संजय मोहिते व नितीन पंडित माने या तिघा संशयितांना रविवारी रात्री अटक केली. या आरोपींना न्यायालयाने दि.१३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती़ तसेच त्यानंतर पोलीस तपासात गणेश पिसे, दत्ता तौर, बबलू शेट्टी व पांडू उर्फ विक्रम पवार (सर्व रा़ बार्शी) यांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने यांनाही आरोपी करुन अटक करण्यात आले आहे. या चार जणांना आज दि़ १५ रोजी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना २० जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ आझाद चौकातून निघालेला हा मोर्चा घोषणा देत तहसील कार्यालयावर आला, त्याठिकाणी नायब तहसीलदार यु़बी़ पवार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़-------------------------------------------आईची न्यायासाठी आर्त हाक माझा मुलगा नागेश हा आमच्या कुटुंबाचा एकुलता एक आधार होता़ त्याच्या जाण्याने आमचा आधारच नाहीसा झाला आहे़ पिसे कुटुंबीयच या खुनामागील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप करत तशा आशयाचे निवेदन तहसीलदारांना देऊन या सर्वांना अटक करण्याची मागणी करुन गुन्ह्याचा तपास योग्य दिशेने करुन आम्हाला न्याय द्यावा अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा अनिता गाढवे यांनी दिला आहे़