शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

वन विभागाची स्पष्टोक्ती; म्हणे.. गाय-वासरावर बिबट्यानं नव्हे तरसानं केला हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 13:11 IST

केसाचे व पायाच्या ठशावरुन निष्कर्ष

करमाळा : सोमवारी भिवरवाडी येथे गायीवर झालेला हल्ला हा बिबट्यानं नव्हे तर तरस या वन्य प्रण्याने केला आहे. घटनास्थळी मिळालेले केसाचे नमुने व पायांच्या ठशावरून सिध्द हे होते, अशी माहिती सोलापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी प्रसिध्दपत्रकान्वये मंगळवारी दिली.करमाळा तालुक्यात  ३ मार्चपासून आतापर्यंत सोलापूर वन विभागाने बिबट्या या वन्य प्राण्याचा बंदोबस्त करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. त्यामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करत थर्मल ड्रोन, डॉग स्कॉड सर्चिंग, डेली पगमार्क डेटा ऑनालेसिस व ऑन स्पॉट कॉल व्हेरिफिकेशन आणि १४ गस्ती पथकांच्या माध्यमातून बिबट्याचे सर्च ऑपरेशन सुरू ठेवले आहे. 

लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सर्व वन कर्मचारी अहोरात्र घरोघरी जाऊन लोकांमध्ये बिबट्या या वन्य प्राण्यांविषयी जनजागृती सुरू केले असल्याचेही त्यांनी सांगितले. मागील एक आठवडा नरभक्षक बिबट्याविषयी लोकांमध्ये पसरलेले गैरसमज व अफवांचे निराकरण करण्याचे प्रयत्न वन विभाग करत आहे. बऱ्याच ठिकाणी बिबट्याच्या पावलांचे ठसे म्हणून तरस, कुत्रे व इतर वन्य प्राण्यांचे ठसे अथवा चित्रफिती या प्रसार मध्यमांमध्ये येत आहेत. लोकांनी इंटरनेटच्या माध्यमातून बिबट्याचे ठसे व त्याची माहिती घेत जुन्या व खोट्या चित्रफिती यांची शहानिशा करावी व नंतरच विश्वास ठेवावा. सोमवारी  भिवरवाडी येथील गायीवर झालेला हल्ला हा तरस या वन्य प्राण्याने केला असून, ते तेथे मिळालेल्या केसाच्या सॅम्पल व पायांच्या ठशांवरून सिद्ध होते. लोकांनी अफवांवर विश्वासू ठेवू नये. कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी घ्यावी; अन्यथा ते कारवाईस पात्र ठरतात, असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरleopardबिबट्या