शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

२८ सशांची शिकार करणाºया २३ जणांना वनविभागाने पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 15:02 IST

वटपौर्णिमेनंतर आलेल्या ‘कर’ची शिकार वनविभागाने हाणून पाडली

ठळक मुद्देट्रॅक्टर, जाळे, लाकडी दंडुके आणि पाळीव कुत्रे ताब्यातशिकाºयांना त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरूवागदरी-गुलबर्गा मार्गावर सशांची शिकार

सोलापूर : वटपौर्णिमेनंतर आलेल्या ‘कर’ची शिकार वनविभागाने हाणून पाडत २३ जणांना पकडले़ मात्र या शिकाºयांनी कोन्हाळीत १५ ससे आणि वागदरी सीमेवर १३ ससे मारले़ हे ससे वनविभागाने ताब्यात घेत त्या २३ जणांना अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात आणून रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू ठेवली होती़ मात्र कारवाईत कोन्हाळीतील शिकारी हाती लागू शकले नाहीत़ वनअधिकाºयांना पाहताच पळून जाण्यात ते यशस्वी ठरले़

वटपौर्णिमेनंतर आलेल्या करनिमित्त वागदरी (ता़ अक्कलकोट) येथील काही युवकांच्या टोळीने शिकार करण्याचा बेत आखला़ दुपारी ही टोळी कोन्हाळीत जाऊन १५ ससे मारले़ काही लोकांनी ही बाब वनविभागाला टोल फ्रीवरून सांगितली़ मुंबई कार्यालयातून सोलापूर वनविभागाला दूरध्वनी आला आणि उपवनसंरक्षक संजय माळी यांनी तत्काळ सूत्रे हलवली़

दरम्यान, एक टोळी कोन्हाळीत शिकार करून परतत असताना त्यांच्या नजरेस वनविभागाचे पथक पडले़ त्यांनी सोबत आणलेल्या एका १० वर्षांच्या मुलाला सोबत आणलेले जाळे तेथेच सोडून पळ काढला़ या शिकाºयांच्या मागावर वनविभागाचे पथक असताना वागदरीतील काहीजन कर्नाटक हद्दीत वागदरी-गुलबर्गा मार्गावर सशांची शिकार करून दुसरी एक टोळी निघाल्याची माहिती मिळाली़ दरम्यान, या पथकाने पुन्हा सापळा लावला आणि दुसºयाच एका टोळीला रंगेहाथ पकडून त्यांच्याजवळील १३ मृत ससे हस्तगत केले़ तसेच आठ पाळीव कुत्रे, जाळे यांच्यासह २३ शिकाºयांना ताब्यात घेतले़ 

रात्री उशिरापर्यंत कारवाई- वागदरी-गुलबर्गा रोडवर रंगेहाथ पकडलेल्या शिकाºयांना वनविभागाच्या अधिकाºयांनी चौकशीकरिता आणि कारवाईकरिता अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात आणले़ त्यांच्यासोबत ताब्यात घेतलेल्या ट्रॅक्टर, जाळे, लाकडी दंडुके आणि पाळीव कुत्रे देखील पोलीस ठाण्याच्या आवारात आणून बांधले होते़ रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू होती.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस