शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील पॅकबंद दुधाच्या विक्रीत परराज्यातील डेअरींचा निम्मा वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 13:15 IST

दर विसंगतीचा घेतात फायदा; अमुल, मदर, नंदिनी विकतात ३३ लाख लिटर दूध

ठळक मुद्देअठरा रुपयांनी खरेदी होणारे दूध ग्राहकांना जवळपास ५० रुपयांनी घ्यावे लागतेराज्यातील डेअºया अधिक दराने खरेदी करून ग्राहकांना कमी दराने विक्री करतातराज्यातील खासगी दूध संघ शेतकºयांना दर कमी देत आहेत

सोलापूर: महाराष्ट्रातील शेतकºयांंकडून प्रति लिटर १८ रुपयांनी खरेदी होणारे दूध ४८ रुपये लिटर दराने ग्राहकांना विकत घ्यावे लागत आहे. राज्यातील दूध संघांतर्गत असलेल्या विसंगतीचा फायदा इतर राज्यातील संघांना झाला असून, अन्य राज्यांतील ३३ लाख लिटर दुधाची विक्री किरकोळ स्वरूपात पिशव्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात होत आहे. परराज्यातील अमुल, मदर आणि नंदिनी पॅकबंद दुधाच्या बाजारपेठेतील ५० टक्के वाटा घेत आहेत.

सध्या राज्यात शेतकºयांकडून खरेदी होणाºया दुधाच्या दराचा विषय ऐरणीवर आहे. महाराष्ट्रात सातत्याने दूध खरेदी दर बदलत असताना ग्राहकांना मात्र लिटरमागे ४६ ते ४८ रुपयेच मोजावे लागत आहेत. राज्य शासनाच्या ‘महानंद’ने चार महिन्यांच्या काळात सहकारी दूध संघाच्या दुधाला २५ रुपये लिटरला दर दिला. खासगी दूध संघांनी मात्र लिटरला २० रुपयेच दर दिला. याशिवाय खासगी संघांमध्ये दरामध्ये स्पर्धा असेल त्या जिल्ह्यात दूध संघ खरेदीचा एक दर तर स्पर्धा नसलेल्या जिल्ह्यात वेगळा दर देतो. खरेदी दर कमी असला तरी ग्राहकांना लिटरला ४६ ते ४८ रुपयेच मोजावे लागत आहेत.

दराच्या स्पर्धेचा परिणाम दुधाच्या गुणवत्तेवर होत असून,यामुळेच इतर राज्यातील दुधाचा महाराष्ट्रातील दूध बाजारावर प्रभाव वाढला आहे. राज्यात पॅकबंद पिशवीतून दररोज ६० ते ६५ लाख लिटर दुधाची विक्री होते. यापैकी कर्नाटक, पंजाब व गुजरातच्या दुधाची ३३ लाख लिटर विक्री होत असल्याचे सांगण्यात आले. गुजरातच्या ‘अमुल’ची २३ लाख, पंजाबचे मदर दूध साडेचार ते पाच लाख लिटर तर कर्नाटकच्या ‘नंदिनी’चे पाच लाख लिटर दूध महाराष्ट्रात विक्री होत आहे.--------------दरातील तफावत कमी व्हावी!आमच्यात ताळमेळ नसल्याने इतर राज्यांतील दूध खरेदीकडे ग्राहक वळले आहेत. शेतकºयांकडून १८ रुपयांनी खरेदी केलेले दूध आमच्याकडून ३४ रुपयांनी लिटरला मिळते; पण ग्राहकांना ४८ रुपयांनी दिले जाते. ही तफावत दूर झाली पाहिजे, अशी अपेक्षा राज्य दूध उत्पादक कल्याणकारी संघाचे प्रकाश कुथवड यांनी व्यक्त केली.- प्रकाश कुथवडराज्य दूध उत्पादक कल्याणकारी संघ, पुणे.---------------अठरा रुपयांनी खरेदी होणारे दूध ग्राहकांना जवळपास ५० रुपयांनी घ्यावे लागते. याउलट इतर राज्यातील डेअºया अधिक दराने खरेदी करून ग्राहकांना कमी दराने विक्री करतात. राज्यातील खासगी दूध संघ शेतकºयांना दर कमी देत आहेत. यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे.- अ‍ॅड. अजित नवले, शेतकरी संघटना, अहमदनगर

टॅग्स :SolapurसोलापूरMilk Supplyदूध पुरवठाmilkदूध