शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

दाढीतून वाचवलेल्या पैशानं दिलं कुष्ठरोगींना भोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 14:47 IST

रॉबिन हूड आर्मीचा उपक्रम; सोशल मीडियावरील आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद

ठळक मुद्देरॉबीन हूड आर्मी या संस्थेने माणुसकीची भिंत या उपक्रमातून आणखी एक अनोखा उपक्रम राबवलाअमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात दाढी न करता वाचवलेल्या पैशातून कॅन्सरग्रस्तांना मदत केली दाढी न करता जमवलेल्या पैशातून १०० कुष्ठरोगी अन् वंचित घटकातील बांधवांना भोजन

सोलापूर: सामाजिक काम करण्यासाठी कोणतीही सीमा नसते. रॉबीन हूड आर्मी या संस्थेने माणुसकीची भिंत या उपक्रमातून आणखी एक अनोखा उपक्रम राबवलाय. अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात दाढी न करता वाचवलेल्या पैशातून कॅन्सरग्रस्तांना मदत केली जाते हीच थीम सोलापुरातही राबवली.  दाढी न करता जमवलेल्या पैशातून १०० कुष्ठरोगी अन् वंचित घटकातील बांधवांना भोजन दिलं. लेप्रसी कॉलनीत हा उपक्रम राबवला.

त्याचं असं झालं, रॉबिन हूड संस्थेशी निगडित असलेल्या प्रशांत भूषण यांना एक कल्पना सुचली. अमेरिकेतील तरुणाईच्या धर्तीवर दाढी न करता त्यातून जमवलेले पैसे सामाजिक कामासाठी वापरावेत. त्यांनी ही कल्पना प्रा. हिंदुराव गोरे शेअर केली अन् तिला मूर्त आलं. सोलापुरातील लेप्रशी कॉलनीतील कुष्ठरोग्यांना एक दिवसाचे भोजन द्यायचं ठरलं. नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभी हा निर्णय झाला. लागलीच सोशल मीडियावरून यासाठी आवाहन केलं अन् चक्क ३० तरुणांनी स्वत:हून संपर्क साधला आणि या मोहिमेत आपला सहभाग नोंदवला. 

नोव्हेंबर महिना संपला. प्रत्येकाने आपल्या दाढी अन् कटिंगसाठीचा जो खर्च वाचवला तो संस्थेकडे जमा केला. कुणाचे १००, कुणाचे १५०, २०० असं करीत ही रक्कम ३ हजारांवर जमली. मग काय, या उपक्रमात सहभागी झालेली तरुणाई आणि रॉबिन हूडच्या सहकाºयांनी लेप्रशी कॉलनी गाठली. या कॉलनीतील ७० जण आजूबाजूची अन्य अशा १०० गरजू, वंचितांना एक दिवसाचं सुग्रास भोजन दिलं. प्रत्येकाच्या चेहºयावरचा तो   आनंद अन् डोळ्यातील तो कृतज्ञ भाव या कार्यकर्त्यांना ऊर्मी देणारा  ठरला. या उत्साहानं तरुणाईही भारावून गेलीय. 

व्हीव्हीपी कॉलेजचे प्रा. अनिल अवधूत व एसव्हीआयटी कॉलेजचे प्रा. प्रशांत मुशन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कुष्ठरोग्यांशी भोजन देण्याचा उपक्रम पार पडला. सौरभ क्षीरसागर, प्रा. अनिकेत चनशेट्टी, नरेश मलपेद्दी, मल्लिनाथ शेट्टी, प्रतीक पुकाळे, आकाश मुस्तारे, आदित्य बालगावकर, स्वामीराज बाबर, अमोल गुंड, समर्थ उबाळे, स्वप्निल गुलेद, प्रेम भोगडे, दिनेश मुशन या तरुणाईनं यासाठी योगदन दिले. 

वंचित घटकांसाठी कार्याची व्याप्ती वाढवणार- समाजामध्ये वंचित घटकातील लोकांना आपलंसं करून त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची वृत्ती समाजामध्ये वाढीस लागण्याची गरज आहे. शहरात अनेक संस्था आपापल्या परीनं ते काम करतायत. आम्हीही अशा उपक्रमाची व्याप्ती आता मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा निर्धार केलाय. तरुणाई अशा अनोख्या उपक्रमासाठी नेहमीच एक पाऊल पुढे असते. फक्त त्यांना दिशा देण्याची अन् एकत्र करण्याची गरज आहे. ती आम्ही यापुढे नेटाने करणार असल्याचा मनोदय या परिवाराचे प्रमुख प्रा. हिंदुराव गोरे यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :SolapurसोलापूरRobin Hood Armyराॅबिन हुड अार्मी