शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
4
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
5
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
6
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
7
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
8
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
10
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
11
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
12
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
13
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
14
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
15
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
16
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
17
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
18
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
19
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
20
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

सोलापूरातील उड्डाण पुलाचे टेंडर निघाले, शांती चौक ते गेंट्याल चौकादरम्यान १४४.५ कोटींचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 12:50 IST

शहरात उभारण्यात येणाºया बहुचर्चित उड्डाण पुलाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन चौपदरी उड्डाण पुलापैकी बोरामणी नाका ते पत्रकार भवन चौक यादरम्यानच्या कामाला सर्वप्रथम सुरुवात होत आहे.

ठळक मुद्दे शांती चौक ते गेंट्याल चौक येथील कामाची निविदा राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने जारी केलीएप्रिलपर्यंत कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईलभूसंपादनासाठी १२० कोटी लागणार

राकेश कदमसोलापूर दि १० : शहरात उभारण्यात येणाºया बहुचर्चित उड्डाण पुलाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन चौपदरी उड्डाण पुलापैकी बोरामणी नाका ते पत्रकार भवन चौक यादरम्यानच्या कामाला सर्वप्रथम सुरुवात होत आहे. या मार्गावरील शांती चौक ते गेंट्याल चौक (२ किमी ८०० मीटर) येथील कामाची निविदा राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने जारी केली आहे. यासाठी १४४.४९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. निविदा प्रक्रिया जानेवारीपर्यंत चालणार आहे. यानंतरच्या दोन महिन्यात कामाला मंजुरी मिळेल आणि एप्रिल २०१८ पर्यंत काम सुरू होईल, असा विश्वास राष्ट्रीय राजमार्र्ग प्राधिकरणाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला आहे. दुसºया कामाची निविदा प्रक्रियाही लवकरच सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.  शहरात जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन चौक (४.९२ किमी)  आणि जुना पुणे नाका ते संभाजी तलाव (५.४० किमी) यादरम्यान चौपदरी उड्डाण पूल उभारण्यात येणार आहे. गेल्या अडीच वर्षांपासून उड्डाण पुलाच्या कामाची चर्चा आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच या कामांना लवकरच सुरुवात होईल, असे सांगितले होते. शहरातील मुख्य मार्गावरील या उड्डाण पुलांसाठी आवश्यक अतिरिक्त जागा महापालिकेने संपादित करून द्यायची आहे. भूसंपादन झाल्यानंतरच कामांना सुरुवात होईल, असे राजमार्ग प्राधिकरणाने वारंवार सांगितले होते. बोरामणी नाका ते पत्रकार भवन चौक या दरम्यानच्या कामाचेही महामार्ग प्राधिकरणाने टप्पे पाडले आहेत. -------------------याच कामाला प्राधान्य का? जागा मिळाली की कामाला सुरुवात होईल, असे राजमार्ग प्राधिकरण सांगत आहे. महापालिकेकडून त्यासाठी प्रयत्नही सुरू आहेत. शांती चौक ते गेंट्याल चौक या २.८२८ किलोमीटर यादरम्यानचा रस्त्यालगतची आवश्यक असलेली जागा ही शासकीय मालकीची आहे. येथील कामात फारशी अडचण येणार नाही. त्यामुळे हा टप्पा ठरवून निविदा प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. या कामाची ई-निविदा सर्वप्रथम जारी करण्यात आली आहे. इतर ठिकाणी बाधित लोकांना जागा सोडण्यास सांगण्यात आले आहे. अतिक्रमणही बाजूला काढण्यास सांगण्यात आले आहे. जूना पुणे नाका ते संभाजी तलाव या दरम्यानच्या भूसंपादनाला वेळ लागत असला तरी अडथळे लवकरच दूर होतील, असा विश्वासही अधिकारी व्यक्त करीत आहेत. ---------------भूसंपादनासाठी १२० कोटी लागणार४दोन्ही उड्डाण पुलाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या जागा आणि बाधित इमारतींची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जारी केली आहे. महामार्ग प्राधिकरणाने दोन्ही मार्गावर बाधित होणाºया इमारतींवर खुणा केल्या आहेत. दोन्ही मार्गावर नुकसान भरपाईसाठी १२० कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. ----------------एप्रिलपर्यंत कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईलकामाला मंजुरी मिळाल्यानंतर ठेकेदाराने दोन वर्षांत काम पूर्ण करायचे आहे. शांती चौक ते गेंट्याल चौक येथील कामाची निविदा प्रक्रिया मार्चअखेरपर्यंत मंजूर होईल. एप्रिल २०१८ पर्यंत कामाला सुरुवात झालेली असेल. यादरम्यान भूसंपादन पूर्ण होईल त्या ठिकाणी कामांना सुुरुवात होणार आहे. त्यामुळे महापालिकेने लवकरात लवकर भूसंपादन करून जागा देणे अपेक्षित आहे. - संजय कदम, प्रकल्प संचालक.