शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयीन सुरक्षेत हलगर्जी केल्याप्रकरणी सोलापूर शहर पोलीस दलातील पाच पोलीस निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 20:33 IST

न्यायालयीन कामकाज सुरू असताना कोर्टात कुºहाड घेऊन आलेल्या व्यक्तीस पकडण्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले.

ठळक मुद्देकर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा परिणाम नागरिकांसह पोलिसांवरड्यूटीवरील कर्मचाºयांनी सजगता दाखवायला हवी : महोदव तांबडे कुºहाड घेऊन आलेल्या व्यक्तीस पकडण्यात हलगर्जीपणा

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : न्यायालयीन कामकाज सुरू असताना कोर्टात कुºहाड घेऊन आलेल्या व्यक्तीस पकडण्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले.फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार मल्लिकार्जुन पालवे, शहर पोलीस मुख्यालयातील सहायक फौजदार भीमाशंकर मारूती वाघे, विजापूर नाका पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार वसंत चिंतामणी जैन, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे हवालदार अशोक बाबुराव गावित, जेलरोड पोलीस ठाण्यातील पोलीस ज्ञानदेव खंडू कोळेकर अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत.पोपट शामराव नलावडे (वय ६७,रा. हळदुगे, ता. बार्शी) हा  माहिती अधिकाराखाली माहिती मागण्यासाठी २० डिसेंबर रोजी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यु. बी. हेजीब यांच्या कोर्टात आला होता. अपील कामकाजासाठी येवून तो कागदपत्रावर पोहोच मागत होता. त्यावेळी पोहोच देता येणार नाही असे न्यायाधीशांनी सांगितले असता, त्याने सोबत आणलेली कुºहाड बाहेर काढली.  न्यायाधीश हेजीब यांनी न्यायालयात ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचाºयांना बोलावले. १० ते १५ मिनिटांनी पोलिस त्यांच्या कोर्टात उशीरा पोहोचले. पोलिसांनी यावेळी केवळ बघ्याची भूमिका घेतली. आरोपीविरूद्ध कोणतीही कारवाई केली नाही. ही बाब पोलिसांची प्रतिमा मलीन करणारी असल्याने पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी पाच पोलिसांना शनिवारी निलंबित केले.यापूर्वी दोन नोव्हेंबर रोजी व्यंकटेश बंदगी हा आरोपी कुºहाड घेऊन आला होता. यावेळी हलगर्जीपणा केला म्हणून एका महिला पोलिसास निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर दुसºयांदा हा प्रकार घडला आहे.----------कर्तव्यात कसूर केल्याने कारवाई करण्यात आली.  ड्यूटीवरील कर्मचाºयांनी सजगता दाखवायला हवी होती. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा परिणाम नागरिकांसह पोलिसांवर होतो. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची होती.- महोदव तांबडेपोलीस आयुक्त

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस