शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

साडेपाच हजार शेतकऱ्यांची लाइट तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:23 IST

गेल्या अनेक वर्षांपासून वीज बिल थकीत आहे. शेतकऱ्यांनीसुद्धा बिल माफ होईल या आशेवर भरलेच नाही. त्याची रक्कम आता ...

गेल्या अनेक वर्षांपासून वीज बिल थकीत आहे. शेतकऱ्यांनीसुद्धा बिल माफ होईल या आशेवर भरलेच नाही. त्याची रक्कम आता १ लाखाच्या घरात गेली आहे. शासनाने शेतकऱ्यांना सोयीचे व्हावे म्हणून दोन महिन्यांपूर्वी कृषी धोरण-२०२० या योजनेखाली पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक बिलात सूट देण्याची योजना अमलात आणली. त्याकडे शेतकऱ्यांनी गांभीर्याने पाहिले नाही. त्यात राज्य सरकार कधी वीज तोडू नका, तर कधी सर्वांना वीज बिल भरावे लागणार आहे, अशा धरसोड वृत्तीमुळे शेतकरी व अधिकारी, कर्मचारी सर्वजण संभ्रमात होते.

अचानकपणे १३ मार्चपासून सरसकट डीपी बंद करण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील केळी, ऊस, गहू, हरभरा, भाजीपाला अशी सर्व पिके वाळू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांमधून एकच पळापळी सुरू झाली आहे. यंदाच्या वर्षी कोरोना, अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे नियोजन कोलमडले आहे. अशा दुहेरी संकटात सापडलेला शेतकरी नाराज झाल्याच्या भावना नंदकुमार चव्हाण, चुंगी, प्रशांत म्हेत्रे, सलगर, गंगाधर बिराजदार, रामपूर, आंदप्पा कळके, अक्कलकोट यांनी व्यक्त केल्या.

----

४६० रोहित्राचा वीजपुरवठा खंडित

तडवळ, गुद्देवाडी, अंकलगे, कोर्सेगाव, दुधनी, मैंदर्गी, चप्पळगाव, चुंगी, मोटयाळ, कुरनूर, किणी, वागदरी, घोसळगाव, नागणसूर, तोळणूर, जेऊर, शिरवळ आदी भागातील तब्बल ४६० रोहित्राचा वीज पुरवठा खंडित केला आहे.

कनेक्शन ५ एचपीचे; बिल ७ एचपीचे

वीज खंडित केलेल्या रोहित्रावर जवळपास ५ हजार ५२० शेतकऱ्यांचे विद्युत पंप आहेत. ‘माझे ५ एचपीचे कनेक्शन असताना मला साडेसात एचपीचे बिल आल्याचे नंदकुमार चव्हाण यांनी सांगितले, तसेच माझे वीज बिल पूर्णपणे भरलेले असताना थकीत शेतकऱ्यांबरोबर माझा वीज पुरवठा बंद केल्याची तक्रार त्यांनी महावितरण कार्यालयात केली.

----

शासनाच्या आदेशानुसार शेतीपंपाच्या थकीत वीज बिल वसुली मोहीम तीव्र केली आहे. ४६० डीपी बंद करण्यात आल्या. १ ते १५ मार्च या कालावधीत ७६१ शेतकऱ्यांनी १ कोटी ३६ लाख रुपयांचा वीज बिल भरणा केला आहे. जे बिल भरणा करीत आहेत त्यांना तात्काळ जोडणी करून देण्यात येत आहे. शेतकऱ्यांमधून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन दिवसांपासून डीपी बंद केल्या जात होत्या. यापुढे वैयक्तिक शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडण्यात येणार आहे. यापूर्वी संबंधित शेतकऱ्यांना मोबाइलद्वारे नोटीस देण्यात आली आहे.

- संजीवकुमार म्हेत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी.

----

अक्कलकोट येथील महावितरणच्या कार्यालयासमोर बिल भरण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेली गर्दी.