शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जमीन पुन्हा नावावर करून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 08:58 IST

पंढरपुरातील घटना;

पंढरपूर : व्याजाने पैसे दिले अन जमीन लिहून घेतली. परंतु ज्यादा व्याज मागून जमीन नावावर करून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सावकारा विरुद्ध पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,वाखरी (ता.पंढरपूर) येथे संजय लेंगरे यांची वाखरी (ता.पंढरपूर) येथे वडीलोपार्जीत शेती गट नं २४/४/अ  मधील त्याचे वाट्याला १ एकर जमिन आहे. सन २०१६ साली संजय लेंगरे याच्या कुटुंबाला तातडीचे पैशाची निकड पडल्याने त्यांनी इसबावी पंढऱपुर येथील सतिश तानाजी घंटे यांच्याकडुन ५ लाख ४५ हजार रुपये घेतले होते. त्याबदल्यात त्यांनी सतिश तानाजी घंटे यांना १ एकर वडीलोपार्जीत जमिनिपैकी २० गुंठे जमिन लिहुन दिली होती. त्यावेळी ती रक्कम परत केल्यानंतर जमिन परत देण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे संजय लेंगरे यांनी २३ जुलै २०१८ रोजी सतिश तानाजी घंटे यांना २ लाख रुपये परत केले होते. उर्वरीत रक्कम देखील परत करुनाही जमिन संजय लेंगरे याच्या नावावर केली नाही. उलट सतिश तानाजी घंटे यांनी संजय लेंगरे यांना तुमची मुद्दल व व्याज मिळुन २० लाख रुपये होतात असे सांगितले. 

संजय लेंगरे यांनी ५ लाख ४० हजार रुपये ऐवजी ७ लाख रुपये घे परंतू आमची जमिन आम्हाला परत दे असे सांगीतले. परंतू त्याने त्यास नकार दिला व २० लाख रुपयेची मागणी करु लागला आहे. 

त्याला वारंवार ठरल्याप्रमाणे पैसे घे व आमची जमिन आम्हाला परत दे असे सांगीतले. परंतु त्याने पैसे परत न मिळाल्यास मी जमिन दुस-याला विकुन टाकतो असे सांगु लागला. म्हणुन संजय लेंगरे यांची पत्नी वैशाली संजय लेंगरे यांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सतिश तानाजी घंटे यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रेमकुमार केदार हे करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूर