महूद येथील ॲड. विजयकुमार लक्ष्मण धोकटे मंगळवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास नातवाला घेऊन गावातल्या अंबिकादेवीच्या दर्शनासाठी निघाले होते. त्यावेळी गावातील पोस्टमास्तरांनी त्यांना फोनवरून तुमच्या मागणीप्रमाणे तुमच्या खात्यातील रक्कम तुम्हाला देण्याकरिता संमती दिली असून, तुम्ही ते घेऊन जा, असा निरोप दिला.
त्यानंतर ॲड. धोकटे यांनी पोस्टातून ५० हजारांचे २ बंडल घेऊन एक उजव्या व दुसरा डाव्या खिशात ठेवले. तेथून दर्शन घेऊन परतताना मुद्रा कलेक्शन दुकानात नातवाला आइस्क्रीम घेऊन बाहेर आले. त्यांनी खिशातील पैशांची खात्री केली असता डाव्या खिशातील ५० हजार रुपयांचे बंडल गायब झाल्याचे लक्षात आले. दुकानासह आजूबाजूला शोध घेतला मात्र ते सापडले नाही.
---चोरटा सीसीटीव्हीत कैद---
दरम्यान, त्यांच्या खिशातील पैसे काढणारा चोरटा दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याबाबत ॲड. विजयकुमार लक्ष्मण धोकटे यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.