आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ५ : जगाचा पोशिंदा हा देशाचा राजा आहे़ मात्र त्याची अवस्था वाईट आहे़ दुष्काळ आणि कर्जबाजारीपणाचे मोठे संकट त्याच्यावर ओढावले आहे़ जगाची अर्थव्यवस्था कोलमडली, परंतु भारताची मात्र कोलमडली नाही़ कारण भारतीय अर्थव्यवस्था ही शेतीव्यवसायाशी निगडित आहे़ बळीराजा मोडून पडला तर देश कोलमडून पडेल, अशी भीती व्यक्त करीत प्रयोगशील शेती करुन विकास करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आ़ सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले़ जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने कै़ शंकरराव मोहिते-पाटील उत्कृष्ट गोपालक, पशुमित्र पुरस्कार, कृषीनिष्ठ शेतकरी व कृषीमित्र पुरस्कारांचे वितरण आ़ म्हेत्रे यांच्या हस्ते करण्यात आले़ याप्रसंगी ते बोलत होते़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि़प़चे उपाध्यक्ष शिवानंद पाटील होते़ व्यासपीठावर जि़पक़ृषी व पशुसंवर्धन सभापती मल्लिकार्जुन पाटील, अर्थ व बांधकाम समिती सभापती विजयराज डोंगरे, जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले, जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड आदी उपस्थित होते.आ़ म्हेत्रे पुढे म्हणाले, देशात तीन प्रकारचे शेतकरी आहेत़ एक कष्टाळू, दुसरा बांधावरचा आणि तिसरा केवळ सातबाºयावरचा़ आजचे पुरस्कार हे कष्टाळू शेतकºयांना मिळाले याचा आनंद आहे़ बांधावर उभा राहून शेती करणारा देशाचा व पर्यायी आपला विकासही साधत नाही़ त्यासाठी दिवसरात्र कष्टच करावे लागतात़ शेतामध्ये काबाडकष्ट केल्यावरच शेतीचा विकास होतो़ यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले की, पशुपालन व्यवसाय जरी पारंपरिक असला तरी तो शेतीला जोडव्यवसाय म्हणूनच पाहिला जातोय. शेतीबरोबर उत्पादन आणि मार्केटिंगलाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे़ यानंतर जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड यांनी मनोगतातून ज्या माणसाच्या घरात गाय आणि तिचे दूध, भाजीपाला असतो त्याच्या घरी सुख नांदत असते, असे ते म्हणाले़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंगनाथ काकडे यांनी केले़---------------------- कृषीनिष्ठ पुरस्कार : निरज जाधव (अक्कलकोट), रावसाहेब भांगे (करमाळा), छाया बोराडे (माळशिरस), उत्कर्ष देशमुख (माढा), बाबासाहेब बेलदार (मंगळवेढा), नागेश घोलप (मोहोळ), विक्रांत हविनाळे (दक्षिण सोलापूर), तानाजी हाके (पंढरपूर), सूर्यकांत कोळेकर (सांगोला)़- उत्कृष्ट पशुपालक : शंकर जानराव (अक्कलकोट), किसनराव पाटील (बार्शी), पांडुरंग लोंढे (करमाळा), सतीश टोणपे (माढा), सविता पवार (मोहोळ), काशिलिंग वाघमोडे (मंगळवेढा), लक्ष्मण पाटील (सांगोला), सोमनाथ माळी (पंढरपूर), कांतुकुमार इंगळगी (दक्षिण सोलापूर), काशिनाथ गौडगुंडे (उत्तर सोलापूर), बाबासाहेब गोडसे (माळशिरस)़- २०१६-१७ चे मानकरी :अशोक काजळे (अक्कलकोट), सदाशिव चव्हाण (बार्शी), अक्षय गायकवाड (करमाळा), नयन सुरवसे (माढा), अनिल माने (मोहोळ), भीमराव बनसोडे (मंगळवेढा), वनिता लवटे (सांगोला), नागनाथ घाडगे (पंढपरपूर), संजय देशमुख (उत्तर सोलापूर), दिलीप पवार (माळशिरस)़- २०१८-१९ चे मानकरी : समर्थ भालके (अक्कलकोट), तुळशीदास खुने (बार्शी), प्रशांत कोपनर (करमाळा), रेणुका देशमुख (माढा), बिरा होनमाने (मोहोळ), रावसाहेब चौगुले (मंगळवेढा), मल्हारी बोरकर (सांगोला), माणिक उपासे (पंढरपूर), विलास खंडागळे (दक्षिण सोलापूर), राजाराम चव्हाण (उत्तर सोलापूर), लक्ष्मण बंडगर (माळशिरस)
शेतकºयांनी आता प्रयोगशील शेतीद्वारे विकास साधणे गरजेचे, आ़ सिद्धाराम म्हेत्रे यांचे मत, सोलापूर जिल्ह्यातील उत्कृष्ट गोपालक, कृ षीनिष्ठ, कृषीमित्र पुरस्कारांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 13:00 IST
बळीराजा मोडून पडला तर देश कोलमडून पडेल, अशी भीती व्यक्त करीत प्रयोगशील शेती करुन विकास करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आ़ सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले़
शेतकºयांनी आता प्रयोगशील शेतीद्वारे विकास साधणे गरजेचे, आ़ सिद्धाराम म्हेत्रे यांचे मत, सोलापूर जिल्ह्यातील उत्कृष्ट गोपालक, कृ षीनिष्ठ, कृषीमित्र पुरस्कारांचे वितरण
ठळक मुद्देजिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने कै़ शंकरराव मोहिते-पाटील उत्कृष्ट गोपालक, पशुमित्र पुरस्कार, कृषीनिष्ठ शेतकरी व कृषीमित्र पुरस्कारांचे वितरण देशात तीन प्रकारचे शेतकरी आहेत़ एक कष्टाळू, दुसरा बांधावरचा आणि तिसरा केवळ सातबाºयावरचा़ आजचे पुरस्कार हे कष्टाळू शेतकºयांना मिळाले याचा आनंद आहे़ : आ़ म्हेत्रे