शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शेतकºयांनी एकत्र येऊन गटशेती करावी, मकरंद अनासपुर यांचे आवाहन, कासाळ ओढ्यावर जलपूजन, लोकार्पण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 11:40 IST

जोपर्यंत जनशक्ती एकत्र येत नाही तोपर्यंत गावचा विकास अशक्य आहे, असे असले तरी आजच्या काळात आपण माणुसकी विसरत चाललो आहोत. माणसाचे आयुष्य फार कमी राहिले आहे. तुम्ही आज जे काम केले ते पुढील पिढीसाठी प्रेरणादायी असेल.

ठळक मुद्देनाम फाउंडेशनच्या माध्यमातून कटफळ गावची दुष्काळी परिस्थिती बदलून टाकली१५० एकर क्षेत्र आले ओलिताखालीजि. प. शाळेत डिजिटल शाळेची सुरुवात

आॅनलाइन लोकमत सोलापूरसांगोला दि ८ : जोपर्यंत जनशक्ती एकत्र येत नाही तोपर्यंत गावचा विकास अशक्य आहे, असे असले तरी आजच्या काळात आपण माणुसकी विसरत चाललो आहोत. माणसाचे आयुष्य फार कमी राहिले आहे. तुम्ही आज जे काम केले ते पुढील पिढीसाठी प्रेरणादायी असेल. कासाळ ओढ्यात ५०४ टीसीएम जलसाठा तयार झाल्याने शेतकºयांनी एकत्र येऊन गटशेतीचा प्रयोग करावा. यापुढे गावातील युवकांनी प्रत्येक कामात संवाद साधून जलसंधारणाची कामे करावीत. तरच हिवरे बाजार, राळेगणसिद्धीसारखा आपल्याला बदल झालेला दिसेल, असे सांगून नाम फाउंडेशन नेहमी तुमच्या बरोबर असेल, असा विश्वास नाम फाउंडेशनचे संस्थापक, सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी दिला. कटफळ (ता. सांगोला) येथील गावची अर्थवाहिनी असलेल्या सात कि. मी. कासाळ ओढ्याचे लोकसहभाग, नाम फाउंडेशन, जनशक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून पुनरुज्जीवनामुळे ओढ्यावरील पाच बंधाºयांसह ओढ्यात सुमारे ५०४ टीसीएम पाणीसाठा झाला आहे. या पाण्याचे जलपूजन व लोकार्पण सोहळा नाम फाउंडेशनचे संस्थापक, सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पाण्याची खणानारळांनी ओटी भरून जलपूजन करताच नाम फाउंडेशनचा विजय असो, जनशक्ती संघटनेचा विजय असो, असा नारा देण्यात आला.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, तहसीलदार संजय पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार, उपसंचालक जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे, नाम फाउंडेशनचे राजाभाऊ शेळके, सभापती मायाक्का यमगर, सरपंच प्रा. सरिता भिंगे, चंद्रकांत देशमुख, प्रा. नानासाहेब लिगाडे, जि. प. सदस्य गोविंद जरे, अ‍ॅड. सचिन देशमुख, माजी सरपंच उत्तम खांडेकर, महुदचे सरपंच बाळासाहेब ढाळे, उपसरपंच दिलीप नागणे, रवींद्र कदम, उद्योजक विठ्ठल बागल, मच्छिंद्र खरात, अ‍ॅड. धनंजय मेटकरी यांच्यासह कृषी व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, युवक, ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मकरंद अनासपुरे यांनी जनशक्ती फाउंडेशनने गावात महिला संवाद केंद्र सुरू करून महिलांच्या समस्या याच केंद्रामार्फत सोडवाव्यात. या केंद्रातून महिलांना रोजगार चांगल्या पद्धतीने उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करावेत. या कामात नाम फाउंडेशन तुमच्या पाठीशी असेल, असे सांगितले. या गावातील जो युवक हुंडा घेईल, तो नामर्द असेल. युवकांनी हुंडा न घेता महिलेचा आदर करावा, असा मौलिक सल्लाही अनासपुरे यांनी दिला. ओढा परिसरपरिसर हिरवागार करा, तो मी पाहण्यास जरूर येईन, असे आश्वासनही अनासपुरे यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी  भोसले, कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार, चंद्रकांत देशमुख, राजाभाऊ शेळके, मारुती पुजारी आदींनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक उपसरपंच प्रा. संतोष सावंत यांनी केले. सूत्रसंचालन आबासाहेब खरात यांनी केले, तर अ‍ॅड. विजयसिंह खरात यांनी आभार मानले.-------------------कटफळचा बाजारपेठेत दबदबानाम फाउंडेशनच्या माध्यमातून कटफळ गावची दुष्काळी परिस्थिती बदलून टाकली. या कामात मकरंद अनासपुरे यांचा सिंहाचा वाटा आहे. आता आम्ही ३ हजार ३०० एकर वन क्षेत्रावर सीसीटी तयार करून पावसाळ्यात पडणारे पाणी गावातच अडवून गाव कसे पाणीदार होईल, यासाठी काम करणार आहोत. आज पाण्यामुळे आमच्या भागात फळे, भाजीपाल्याच्या दर्जेदार उत्पादनामुळे कटफळचा बाजारपेठेत दबदबा वाढल्याचे जनशक्ती फाउंडेशनचे मार्गदर्शक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.------------------जि. प. शाळेत डिजिटल शाळेची सुरुवात- या कार्यक्रमाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी दिवसानिमित्त कटफळ परिसरात जि. प. प्राथ. शाळेत डिजिटल शाळा उपक्रमास सुरुवात केली. उद्योजक नवनाथ हांडे यांच्या सहकार्यातून मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते शाळेला संगणक संच भेट देऊन विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला. --------------१५० एकर क्षेत्र आले ओलिताखाली- आपल्या गावातील लोक गावातच कसे राहतील, ही उमेद घेऊन गावातील मारुती मंदिरात नाम फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आणि बघता-बघता गावातील सर्वांनी मतभेद विसरून कासाळ ओढा पुनरुज्जीवन केल्याने १५० एकर क्षेत्र सुपीक होऊन ओलिताखाली आले आहे. हे एकीचे बळ असल्याचे प्रा. संतोष सावंत यांनी सांगितले.