शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

लबाड लांडगं सोंग करतंय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 10:50 IST

राजकीय टोलेबाजी...अन फटकारे..

विलास जळकोटकर

(गाव, शहर, वस्त्यांवर निवडणुकीच्या प्रचाराचा मारा.. गावभेटींचा जोर वाढलाय. घरासमोरून जाणाºया प्रचारफेरीच्या गोंगाटानं टीव्ही पाहत बसलेला पिंंटू बाहेर येतो.)पिंंटू : (प्रचारफेरीकडे बोट दाखवत) बाबा, ते पाहा आमचे सर. पण, ते इथं काय करताहेत. बाबा: अरे, त्यांच्या कर्त्याकरवित्याच्या प्रचाराला आले असतीलपिंंटू : कर्तेकरविते म्हणजे काय हो?बाबा: (चिडून) पिंंट्या तुला काही सांगायचं म्हणजे डोक्याचा भुगा करून घ्यावा लागतो बाबा.पिंंट्या: जाऊ द्या बाबा, मी आमच्या सरांनाच विचारतो.. (प्रचारफेरीकडे जाऊ लागतो.) बाबा: गधड्या थांब ! (पाठीत धपाटा मारत) पिंंटू: तुम्हीच म्हणता ना ! शंका असतील तर विचार म्हणून...बाबा: (विचारात पडतात) अरे पिंंटू. ते निवडणुकीला उभे राहिलेले उमेदवार आहेत ना ! त्यांच्या संस्थेत नोकरीला आहेत.पिंंटू: म्हणून काय झालं ? सर आम्हाला आपल्या बुद्धीला पटेल तेच करावे, असा उपदेश करतात. मग, सर कसे प्रचारात....बाबा: पिंंटूबाळा त्यांना त्यांची नोकरी टिकवायची रे. पिंंटू: (चेहºयावर प्रश्नचिन्ह) बाबा, मग उपदेशांचं काय ?बाबा: उपदेशाचा डोस खुंटीला अडकवून काम करावं लागतं. नाहीतर... (पिंंटू काहीवेळ गप्प बसला. पुन्हा न राहून) पिंंटू: बाबा ! ते पाहा बबलूचे पप्पा, ते सुद्धा दिसताहेत प्रचारात. ते कुठं सर आहेत. ते तर बँकेत आहेत ना!बाबा: अरे पिंटू, बँकही त्यांचीच. कारखाने, सहकारी संस्था त्यांच्याच. मग तिथले कर्मचारीही त्यांचेच ना! मग, त्यांनी नको का त्यांचा प्रचार करायला. त्यांना पगार कसा मिळणार ? पिंंटू : अहो बाबा ! पण त्यांना त्यांच्या कामाचा पगार मिळतो. अशा कामाचा नाही ! (पिंंटूचा अजान प्रश्न)बाबा: नोकरी म्हणजे तडजोड.. (कंटाळून) आता  बडबड बंद कर.(बाबा घरात जाऊन टीव्ही आॅन करतात. पंधरा मिनिटांनी बाहेर पुन्हा घोषणांचे आवाज... हळूहळू  जोर वाढतो. काय गडबड चाललीय म्हणून पिंंटूचे बाबा बाहेर येतात. पाठोपाठ पिंंटूही हजर. पदयात्रेत उमेदवारांस घेराव घालून मतदारांकडून प्रश्नांची सरबत्ती सुरू...)पहिला: आता वाट सापडली का? दुसरा:  कामाच्या नावानं बोंब. तिसरा: आमच्याकडे पाणी नाही... लाईट नाही... तलाठी अडवतो. तुम्ही आपलं गायब.. (प्रश्नांच्या सरबत्तीनं सकाळच्या वेळीही त्या उमेदवाराला घाम सुटला अन् काही घडायच्या आत सारे पसार होतात.) पिंंटू : बाबा, कशी फटफजिती झाली नाही का त्यांची ?बाबा: अरे बाबा, आता जनता शहाणी झालीय. लबाड लांडगं ढोंग करतंय.. हे समजलंय. बघू काय यंदातरी काय होतंय ते.पिंंटू: पण बाबा निवडून दिल्यावर कामं करायला नको का? बाबा: हो रे ! पण खुर्ची मिळाली ना, सारं विसरतात. पिंटू : बाबा! काम न करणाºयांना जमालगोटा मिळाला पाहिजे ?(पिंंटूने अकलेचे तारे तोडले. हो रे बाळा ! म्हणत बाबा घरात वळतात.)

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण