शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
3
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
4
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
5
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवस्त्र' पाहिलं का?
7
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
8
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
9
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
10
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
11
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
12
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
14
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
15
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
16
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
17
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
18
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
19
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
20
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...

पूर्वजाविषयी कृतज्ञता, श्रध्दा व्यक्त करण्यासाठी पितृपंधरावडा पाळा - सुनिल शास्त्री गुरूजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 18:36 IST

सोलापूर : भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षातील पूर्ण पंधरवड्यास श्राध्दपक्ष म्हटले जाते़ याच भाद्रपद शुक्ल पोर्णिमेच्या दिवसात वडीधाºया मंडळींना संतुष्ट करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते़ यादिवसात आपल्या पूर्वजाच्या नावाचा पितर बसवून श्राध्द, अन्नदान केल्याने आपल्या घरात सुख, समृध्दी, शांती लाभते असे मत सोलापूरचे प्रसिध्द शास्त्री सुनिल शास्त्री गुरूजी यांनी व्यक्त केलेपितृपक्ष ...

ठळक मुद्दे- पितृपक्ष पंधरावड्यात अन्नदान महत्वाचे- अन्नदान केल्याने समाधान, शांती, धनलाभ होतो- कुटुंबाच्या कल्याणासाठी पितृपक्ष पंधरावडा पाळा

सोलापूर : भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षातील पूर्ण पंधरवड्यास श्राध्दपक्ष म्हटले जाते़ याच भाद्रपद शुक्ल पोर्णिमेच्या दिवसात वडीधाºया मंडळींना संतुष्ट करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते़ यादिवसात आपल्या पूर्वजाच्या नावाचा पितर बसवून श्राध्द, अन्नदान केल्याने आपल्या घरात सुख, समृध्दी, शांती लाभते असे मत सोलापूरचे प्रसिध्द शास्त्री सुनिल शास्त्री गुरूजी यांनी व्यक्त केले

पितृपक्ष पंधरावडयाबद्दल माहिती देताना सुनिल शास्त्री यांनी सांगितले की, आपल्या पूर्वजाविषयी कृतज्ञता व श्रध्दा व्यक्त करण्याच्या काळास पितृपंधरवडा किंवा श्राध्दपक्ष म्हणतात़ ज्या प्रमाणे आपण आपल्या कुलदैवतांची पूजा केल्याने समाधान, शांती प्राप्त होते असे वाटते त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांच्या नावाचा पितर बसवून श्राध्द केल्याने सुख, समृध्दी लाभते़  पितृपंधरावड्याची विधी करताना लोकांनी दक्षिणेच्या बाजुला तोंड करून आपल्या पूर्वजांची नावे घ्यावीत, अंगठयावरून पाणी सोडून पितृाचा ब्राम्हण व देवाचा ब्राम्हण असे दोघांना जेवण द्यावे, शिवाय अन्न लोकांना अन्नदान केल्यास उत्तमच़ याचकाळात पूर्वजाच्या चांगल्यासाठी छत्री, काठी, रोख स्वरूपातील पैसे दान स्वरूपात देतात.

ज्या लोकांना तिथी लक्षात येत नसेल तर पितृपंधरवड्याच्या शेवटच्या दिवशी अमावास्या येते. तिला सर्वपित्री अमावास्या म्हटले जाते. या दिवशी श्राध्द करावे़ यादिवशी सूर्य, चंद्र यांची युती होते. सूर्य कन्या राशीत प्रवेश करतो. श्राध्द पक्षात आपले पूर्वज पृथ्वीवर येऊन आपल्या कुटूंबियांसोबत वास्तव्य करत असतात, असा उल्लेख पुराणात आहे. त्यांच्या संतुष्टीसाठी श्रेष्ठ ब्राह्मणांना जेवण, दान दिले जाते. श्राध्द पक्षात तिर्थस्थानी जाऊन त्रिपींड दान केले जाते. नारायण नागबलीची पूजा केली जाते. आपल्या कुटुंबात सुख- समुध्दी नांदावी म्हणून दानधर्म केले जात असतात.

जो कुटुंबप्रमुख हा पितृपंधरावडा पाळत नाही त्याच्या घरातील प्रत्येक कामात अडथळे निर्माण होतात, रोगराई होते, अपघात होतात, लक्ष्मी, धनाचा नाश होतो, कुलनाश होतो, मनातील इच्छा अपुरी राहते, स्वप्न भंग होतात असे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते असेही सुनिल शास्त्री गुरूजी यांनी सांगितले़

टॅग्स :Solapurसोलापूर