याबाबतची फिर्याद राजकुमार ढोबळे यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिली आहे. मतमोजणीच्या दिवशी दुपारी समाधान आवताडे यांच्या घरासमोर हलगी वाजवत व गुलाल उधळलेला अवस्थेत नाचणाऱ्या चोवीस जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. बेकायदा जमाव जमवून कोरोनाच्या कोणत्याही नियमांचे पालन न करता कोरोना विषाणूंचा संसर्ग माहिती असतानादेखील कोणत्याही प्रकारची काळजी घेतली नाही. निवडणूक आयोगाच्या आदेशाचे पालन केले नाही म्हणून अण्णासो सर्जेराव पाटील, अमर पाटील, अण्णासाहेब पुजारी, राजेंद्र पाटील, पवन बिनवडे, पवन पवार, गणेश पाटील, ऋतुराज मोरे या ब्रह्मपुरी गावातील तर राहुल सावजी, शकील मुजावर, कुमार सावंत, प्रकाश पवार, जहीर पटेल, साजीद इनामदार, सुमित जाधव, गणेश सावंजी, अजय सावंजी, सागर ऊर्फ प्रवीण ननवरे, विष्णू वाकडे, सोमनाथ कोष्टी, सैफन शेख, मारुती वाकडे, सागर काळुंगे, गिरीश बुरकुल या मंगळवेढ्यातील लोकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीचा भंग केला म्हणून भादंवि कलम १८८, २६९, २७० साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम ८५७ चे कलम २३४ व आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ अ प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे.
निवडणुकीचा जल्लोष पडला महागात; मंगळवेढ्याच्या २४ जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:23 IST