शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

फसव्या भाजपला हद्दपार करा : सुशीलकुमार शिंदे, अक्कलकोट येथील सभेत केले वक्तत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 11:07 IST

सरपंच पद हे लहान नसून हे पद भूषविलेले बहुतांश सरपंच मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. भविष्यकाळात सरपंचातूनच एखादा मुख्यमंत्री होऊ शकतो.

ठळक मुद्दे भारतीय जनता पार्टी केंद्रात व राज्यात सत्तेवर आली तेव्हा-तेव्हा राज्य व देश देशोधडीला लागलाकेंद्र व राज्यातील भाजप सरकार फसवे व लबाड आहे : आ. भारत भालकेलोकसभा निवडणुकीत भाजपला हद्दपार करा : आ. भारत भालके

आॅनलाइन लोकमत सोलापूरअक्कलकोट दि १७ : सरपंच पद हे लहान नसून हे पद भूषविलेले बहुतांश सरपंच मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. भविष्यकाळात सरपंचातूनच एखादा मुख्यमंत्री होऊ शकतो. काँग्रेस सर्वसामान्यांचा पक्ष असून हा पक्ष सत्तेपासून दूर गेल्याने सर्वसामान्य व दीनदलितांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आगामी काळात या फसव्या भाजप सरकारला हद्दपार करा, असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.अक्कलकोट येथे काँग्रेस पुरस्कृत निवडून आलेल्या नूतन सरपंच व सदस्यांचा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. सिद्धाराम म्हेत्रे, आ. प्रणिती शिंदे, आ. भारत भालके, आ. रामहरी रूपनवर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, गोकूळ शिंदे, जि. प. कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, उपसभापती प्रकाश हिप्परगी, नगरसेवक चेतन नरोटे, महेश इंगळे, रईस टिनवाला, शहराध्यक्ष भीमाशंकर कापसे, नगरसेवक सद्दाम शेरीकर, दीपामाला आडवितोटे, सावित्री पुजारी, विकास मोरे, पं. स. सदस्य विलास गव्हाणे, जि. प. सदस्या स्वाती शटगार उपस्थित होते.आ. सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले की, भारतीय जनता पार्टी केंद्रात व राज्यात सत्तेवर आली. तेव्हा-तेव्हा राज्य व देश देशोधडीला लागला. आगामी लोकसभेसाठी सुशीलकुमार शिंदे यांनी उमेदवारी घ्यावी. त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी आम्ही सर्व काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी तयार असल्याचे सांगितले. आ. भारत भालके म्हणाले की, केंद्र व राज्यातील भाजप सरकार फसवे व लबाड आहे. सर्वसामान्यांचा विचार पायदळी तुडविणारा आहे. आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत भाजपला हद्दपार करा, असे आवाहन केले.यावेळी राजशेखर हिप्परगी, महेश जानकर, बसवराज माशाळे, महिबूब मुल्ला, दिलीप बिराजदार, सिध्दार्थ गायकवाड, सुनंदा गायकवाड तर काँग्रेस कार्यालय प्रमुख विश्वनाथ हडलगी यांच्यासह सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सातलिंग शटगार यांनी केले तर सूत्रसंचालन आय. आय. हत्तुरे यांनी केले. आभार दिलीप बिराजदार यांनी मानले.