शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मुलाने केली ‘विठ्ठला’ची नित्यपूजा; वारकरी सांप्रदायातून संताप

By रवींद्र देशमुख | Updated: July 30, 2023 18:30 IST

 विठ्ठल-रुक्मिणीची दररोज नित्य महापूजा होत असते. ही पूजा भाविकांच्या हस्ते करण्यासाठी हजारो रुपयांची देणगी स्वीकारली जाते.

सोलापूर : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा कोणताही ठराव न करता मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या चिरंजीवांच्या हस्ते विठ्ठलाची नित्य महापूजा दुधाचा अभिषेक घालून करण्यात आली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच वारकरी सांप्रदायातून तीव्र संताप व्यक्त झाला. या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी वारकरी पाईक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. रामकृष्ण महाराज वीर यांनी केली आहे.  विठ्ठल-रुक्मिणीची दररोज नित्य महापूजा होत असते. ही पूजा भाविकांच्या हस्ते करण्यासाठी हजारो रुपयांची देणगी स्वीकारली जाते. मात्र सर्वसामान्य भाविकांना नित्यपूजेचा मान मिळत नाही. मंदिर समिती कार्यकारी अधिका-यांना कुटुंबासह नित्यपूजा करायची असेल तर मंदिर समितीचा ठराव करणे बंधनकारक असते. मात्र कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या चिरंजीवाने विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा कोणताही ठराव न करता नित्यपूजेचा महाअभिषेक केला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.  मंदिर सरकारकडे आल्यानंतर विषमता दूर होऊन भाविकांना समानतेची वागणूक मिळेल, ही आशा फोल ठरली आहे. मागील काळात गाभा-यात झालेले अंघोळीचे प्रकरण असो, सभामंडपात भजनबंदीचा आदेश असो की अधिका-याचा मुलगा आता केलेला दुग्धाभिषेक असो, या गोष्टीमुळे सामान्य वारकरी भाविक व्यथित होतो. नित्यपुजेला हजारो रूपये मोजूनही असा अभिषेक करता येत नाही. मग संतांनी सांगितलेली हरिदासाच्या (वारकऱ्यांच्या) घरी मज उपजवा जन्मांतरी। हे सोडून आता अधिकाऱ्यांच्या घरी आम्हाला जन्माला घाला म्हणजे अशी पूजा करता येईल, असं मागणं विठ्ठलाला मागावं का? असा प्रश्न सामान्य वारकरी म्हणून पडला आहे. यावर तत्काळ कारवाई होणे अपेक्षित आहे. - रामकृष्ण महाराज वीर, प्रदेशाध्यक्ष, वारकरी संप्रदाय पाईक संघ.

टॅग्स :Solapurसोलापूर