शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील एम्प्लॉयमेंट अन् भैय्या चौकात खोदाई; बाळीवेसचा रस्ताही बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 15:21 IST

स्मार्ट सिटीचे काम : सोलापूरकरांनो, संचारबंदी संपल्यावर घराबाहेर निघण्यापूर्वी काळजी घ्या

ठळक मुद्देजुना एम्प्लॉयमेंट चौक, कामत हॉटेल हा रस्ता पावसाळी गटार टाकण्यासाठी खोदला रामलाल चौक ते भैय्या चौक यादरम्यान काँक्रिटीकरणाचे काम सुरू खोदाईमुळे रस्ता खराब झाला आहे. येथून जाताना काळजी घेणे आवश्यक

सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेच्या कामासाठी शिवाजी महाराज चौक ते तरटी नाका, जुना एम्प्लॉयमेंट चौक परिसर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक (भैय्या चौक) या रस्त्यांवर खोदाई सुरू आहे. दोन दिवसांत लॉकडाऊन शिथिल होईल. त्यानंतर या रस्त्यावर नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

स्मार्ट सिटी योजनेतून शहरातील काही प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. काँक्रिटीकरणापूर्वी भुयारी गटार, पाणीपुरवठा लाईन, भुयारी वायरिंगची कामे केली जात आहेत. शिवाजी महाराज चौक ते तरटी नाका या मार्गावर सध्या काम सुरू आहे. रस्त्याच्या एका बाजूने खोदाई केली आहे. 

मात्र गुरुवारी रात्री हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या कामासाठी मक्तेदाराला तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. पूर्ण बंद असलेला रस्ता एकेरी वाहतुकीसाठी लवकरच खुला होईल, असे स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाºयांनी सांगितले.रामलाल चौक ते भैय्या चौक यादरम्यान काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. पावसाळ्यात भैय्या चौकात पाणी थांबते. या ठिकाणी नव्याने पावसाळी पाणी गटारीचे पाईप टाकण्यात येत असून, एन.जी. मिलच्या बाजूने जाणाºया नाल्याला जोडण्यात येत आहे. यासाठी चौकात खोदाई करण्यात आली होती. शुक्रवारी दिवसभरात काम पूर्ण झाले. परंतु, खोदाईमुळे रस्ता खराब झाला आहे. येथून जाताना काळजी घेणे आवश्यक आहे.

जुना एम्प्लॉयमेंट चौक, कामत हॉटेल हा रस्ता पावसाळी गटार टाकण्यासाठी खोदला आहे. शुक्रवारी हा रस्ता बंद होता. हे काम सोमवारपर्यंत पूर्ण होईल, असे स्मार्ट सिटीचे अधिकारी सांगत असले तरी पावसामुळे या कामाला विलंब लागू शकतो. त्यामुळे नागरिकांनी या रस्त्याऐवजी सात रस्ता, रंगभवन या रस्त्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे.

लक्ष्मी मंडई परिसरात चिखलच चिखलपंचकट्टा ते लक्ष्मी मंडई परिसरात ड्रेनेजलाईनसाठी खोदाई करण्यात आली आहे. पावसाळ्याचे दिवस पाहता मक्तेदाराने रस्त्यावर चिखल आणि माती पसरू नये, याची काळजी घेतल्याचे दिसत नाही. हा रस्ता चिखलमय झाला आहे. या कामाबद्दल मक्तेदाराला सूचना देऊ, असे स्मार्ट सिटीच्या अधिकाºयांनी सांगितले.

लॉकडाऊनचा फायदा घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, एम्प्लॉयमेंट चौक येथील पावसाळी पाण्याच्या गटारीचे क्रॉसिंग पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न आहे. लॉकडाऊननंतर रस्ता वाहतुकीसाठी मोकळा होईल. नागरिकांची गैरसोय होऊ नये, याबाबत दक्षता घेत आहे.- तपन डंके, उपमुख्य तांत्रिक अधिकारी, स्मार्ट सिटी

टॅग्स :SolapurसोलापूरSmart Cityस्मार्ट सिटीSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाroad safetyरस्ते सुरक्षा