शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

कार्यकर्त्यांची घडी विस्कटू देऊ नका, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचे आवाहन, स्व़ ब्रम्हदेवदादा माने यांना सोलापूरात अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 15:53 IST

राजकारणात राग गिळला पाहिजे, ब्रह्मदेवदादांनी तत्त्व जोपासण्यासाठी नातेवाईकांची पर्वा केली नाही, दादांनी मांडलेला विचार पुढे घेऊन जाण्यासाठी एकत्रित कार्यकर्त्यांची घडी विस्कटू देऊ नका, असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.

ठळक मुद्देस्व. ब्रह्मदेवदादा माने यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन सभेत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे बोलत होतेच्जि. प. चे विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी दिलीपराव यांनी आता स्वभावात बदल करण्याची गरज भाषणात बोलून दाखवली बेलाटी-तिºहे येथील ब्रह्मदेवदादा माने इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात प्रथम दादांच्या पुतळ्याला प्रमुखांनी अभिवादन केले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १६ : राजकारणात राग गिळला पाहिजे, ब्रह्मदेवदादांनी तत्त्व जोपासण्यासाठी नातेवाईकांची पर्वा केली नाही, दादांनी मांडलेला विचार पुढे घेऊन जाण्यासाठी एकत्रित कार्यकर्त्यांची घडी विस्कटू देऊ नका, असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.स्व. ब्रह्मदेवदादा माने यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. बेलाटी-तिºहे येथील ब्रह्मदेवदादा माने इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात प्रथम दादांच्या पुतळ्याला प्रमुखांनी अभिवादन केले. राजकारणासोबत शिक्षणाचे केंद्र असणाºया ब्रह्मदेवदादांनी बँक, व्याख्यानमाला सुरू केली. राजकारणात चाणाक्षपणा हवा असतो अन् तो दिलीपरावांकडे असल्याचे शिंदे म्हणाले. बळीराम साठे यांनी भाषणात एकत्रित राजकारण करण्याच्या मांडलेल्या विचाराचा धागा पकडून एकमेकांची तोंडे न बघणारे दक्षिण तालुक्यातील नेतेही एकत्रित आल्याचा उल्लेख शिंदे यांनी केला. जिल्ह्यात गट तटाचे राजकारण १९८० मध्ये सुरू झाले. तालुक्यात राजकारण कधी बळीराम साठे, कधी ब्रह्मदेवदादा तर कधी गंगाराम घोडके सरकारसोबत काम केल्याचे शिंदे यांनी सांगितले.  कष्टकºयांसाठी लढणाºया ब्रह्मदेवदादांनी बँक, शिक्षण संस्था उभारली, दिलीपरावांनी त्यात भरच टाकली असे आ. सिद्धाराम म्हेत्रे यांनी यावेळी सांगितले. परिणामाची पर्वा न करता घेतलेल्या निर्णयाशी दादा पक्के असायचे असेही आ. म्हेत्रे म्हणाले. सत्तेला नमस्कार करणारे अनेक राजकारणात आहेत, सत्ता नसताना आज माझ्यासोबत आहात, दादांसोबतही होता, असे भावूकपणे माजी आ. दिलीप माने यांनी सांगितले. पृथ्वीराज माने यांनी दादांनी उभारलेला समाज परिवर्तनाचा लढा पुढे सुरू ठेवू या, असे यावेळी बोलताना सांगितले. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, शहराध्यक्ष प्रकाश वाले, आ. प्रणिती शिंदे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे, प्रकाश यलगुलवार, विश्वनाथ चाकोते, जयश्री माने, माजी महापौर अलका राठोड, सुशीला आबुटे, जयकुमार माने, धनंजय भोसले,  शैलजा राठोड, राजेंद्र सुपाते, प्रवीण डोंगरे, अविनाश मार्तंडे, जितेंद्र                 साठे, सुनील काटकर, शिवलिंग पाटील, चेतन नरोटे, सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे, गोपाळ कोरे, गुरुनाथ म्हेत्रे, बाबासाहेब पाटील, भारत जाधव, विनोद भोसले, महादेव चाकोते, दिलीप कोल्हे उपस्थित होते. -------------------------दिलीपरावांमुळे एकजूटच्जि. प. चे विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी दिलीपराव यांनी आता स्वभावात बदल करण्याची गरज भाषणात बोलून दाखवली होती. हा धागा पकडून सुशीलकुमार शिंदे यांनी ‘काका, आता दिलीपराव फारच बदलले आहेत. म्हणूनच दक्षिण तालुक्यातील सर्वच मंडळी या व्यासपीठावर दिसत असल्याचे सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदे