गुरुवारी (३ डिसेंबर) आवाटी येथील वलीबाबा दर्गाहमध्ये जश्ने गौसे आजम फातिहा खानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते; मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. त्यामुळे दर्गा परिसरात एकही भाविक फिरकला नाही. दरवर्षी भरणारी जश्ने गौसे आजम धार्मिक कार्यक्रम यावेळेस मोजक्याच भक्ताविना साजरी करण्यात आली.
यावेळी दर्गाह परिसरात सुरक्षा रक्षकांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वली चांद पाशा बाबाचे आदेश व शासनाच्या नियमांचे पालन करीत दर्गाह विश्वस्त कमिटीने हा धार्मिक कार्यक्रम भक्ताविना शांततेत साजरा केल्याचे दर्गाह कमिटीचे अध्यक्ष हाजी कादरभाई तांबोळी, विश्वस्त गुलामनबी कादरी व इरफान कादरी यांनी सांगितले.
०३करमाळा-आवाटी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवाटी येथील वलीबाबा दर्गाह परिसरात सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.