अक्कलकोट : तालुक्यातील शिरवळ येथे भाजपचे माजी आमदार स्व. बाबासाहेब तानवडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त २५ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी सांगितले. यामध्ये सकाळी प्रतिमा पूजन आणि त्यानंतर रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. त्यानंतर वागदरी गटातील नूतन ग्रामपंचायत सदस्य व कोविड योद्धांचा सन्मान सोहळा होणार आहे. महादेव कोगनुरे यांच्या हस्ते हा सन्मान होणार असून, अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतल जाधव उपस्थित राहणार आहेत. यावेळी अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अशोक राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे, के. एस. पुजारी, नगराध्यक्षा शोभा खेडगी, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष मल्लिनाथ स्वामी आदी उपस्थित राहणार आहेत.
बाबासाहेब तानवडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:48 IST