शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

सोलापुरातील रंगभवन ते आंबेडकर चौक रस्त्याचे काम मुदत संपत आली तरीही ‘आणखी थांब’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 10:22 IST

संथगती : झेडपी गेट, डफरीन चौक परिसरात वाहतुकीच्या कोंडीचा त्रास

ठळक मुद्देस्मार्ट सिटीचे काम अन् बारा महिने थांब, अशी गत सोलापूर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या अनेक कामांबाबत झालीस्मार्ट रोडच्या कामाची मुदत दीड महिन्यात संपत असून, अद्याप अर्धेच काम झाल्याचे दिसतेपर्यायी मार्गांवर वाहतुकीची कोंडी होत असून सोलापूरकर मेटाकुटीला

सोलापूर : स्मार्ट सिटीचे काम अन् बारा महिने थांब, अशी गत सोलापूर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या अनेक कामांबाबत झाली आहे. रंगभवन ते डॉ. आंबेडकर चौक यादरम्यान साकारण्यात येत असलेल्या स्मार्ट रोडच्या कामाची मुदत दीड महिन्यात संपत असून, अद्याप अर्धेच काम झाल्याचे दिसते. यामुळे जि.प.समोरील रस्ता, डफरीन चौक, डॉ. आंबेडकर चौक या पर्यायी मार्गांवर वाहतुकीची कोंडी होत असून सोलापूरकर मेटाकुटीला आले आहेत.

स्मार्ट रोडच्या कामाचा कार्यारंभ आदेश १७ जुलै २०१७ रोजी पुण्याच्या निखिल कन्स्ट्रक्शनला देण्यात आला होता. रस्त्याच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले. परंतु, त्यांची वेळ मिळाली नाही. मुख्यमंत्र्यांची वाट पाहण्यात दोन महिने गेले. अखेर सहकारमंत्री आणि पालकमंत्री यांच्या उपस्थितीत २३ सप्टेंबर २०१७ रोजी कामाचे उद्घाटन झाले.नियमानुसार ठेकेदाराने १५ महिन्यांत या रस्त्याचे काम पूर्ण करणे अपेक्षित आहे. कामाला सुरुवात झाल्यानंतर पुन्हा जानेवारी २०१८ मध्ये गड्डा यात्रेच्या निमित्ताने काम बंद ठेवण्यात आले. सध्या रंगभवन ते मराठा मंदिर प्रवेशद्वार यादरम्यान डांबरीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या भागातील पाईपलाईन, भुयारी गटार ही कामे पूर्ण झाली आहेत. वाहनांसाठी अर्धवटपणे रस्ता खुला करण्यात आला आहे. 

उड्डाणपूल घेणार बराच वेळ - हरिभाई देवकरण प्रशालेसमोर भुयारी मार्ग आणि उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. हे कामही अर्धवट आहे. रस्ता आणि उड्डाण पुलासाठी मोठी खोदाई करण्यात आली. त्यातून निघालेला मुरुम, मोठे दगड, सिमेंटचे पाईप असे बरेच साहित्य मैदानावरच पडून आहे. दीड महिन्यांवर गड्डा यात्रा आहे. तत्पूर्वी हे सर्व साहित्य हटविले जाणार की नाही, याबद्दलही शंका आहे. हरिभाई देवकरण प्रशाला ते आंबेडकर चौक यादरम्यान एकेरी मार्ग खुला आहे तर दुसºया मार्गावर खोदाई आणि दुरुस्तीची कामे सुरूच आहेत. हा मुख्य रस्ता बंद असल्याने डफरीन ते डॉ. आंबेडकर चौक आणि जिल्हा परिषद गेट या मार्गावर वाहतुकीची कोंडी होत असते. 

कारणांची कमतरता नाही - स्मार्ट सिटी कंपनीतील वरिष्ठ अधिकाºयांच्या मते, स्मार्ट रोडचे काम डिसेंबर २०१८ अखेर पूर्ण होईल. गड्डा यात्रेमुळे एक महिना काम थांबले. यानंतर पाणीपुरवठ्याचे पाईप बदलण्यासाठी बराच कालावधी लागला. उन्हाळ्यात एखादा पाईप फुटला असता तर शहरात ओरड झाली असती. त्यामुळे दक्षता घेऊन काम करावे लागले. भुयारी वायरिंगमधील वायर खरेदीचे काम मूळ प्रकल्पात समाविष्ट नव्हते. स्मार्ट सिटी कंपनीने वायरची खरेदी केली. यातून ४० लाख रुपयांची बचत झाली. पण, कामाला तीन महिने विलंब लागला. वाळू उपलब्ध नसल्याने उड्डाण पुलाच्या कामाला विलंब झाला.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSmart Cityस्मार्ट सिटी