शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
3
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
4
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
5
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
6
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
7
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
8
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
9
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
10
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
11
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
12
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
13
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
14
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
15
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
16
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
17
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
18
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
19
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
20
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री

सोलापुरात साकारलेल्या अश्वारुढ शिवमूर्तीची मध्यप्रदेशात प्रतिष्ठापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 14:51 IST

नितीन जाधव यांची शिल्पकला; तीन महिन्यांत तयार केली चौदा फुटी मूर्ती

ठळक मुद्देशिवाजी महाराजांची मूर्ती आपण बनवावे असे सर्वच मूर्तीकारांचे स्वप्न असते़ही मूर्ती बनवण्यासाठी तीन महिने लागलेमध्यप्रदेशात मूर्तीची प्रतिष्ठापना ही सोलापूरकरांना अभिमान

रुपेश हेळवे

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती ही देशात नाही तर जगात पसरलेली आहे़ यामुळे शिवाजी महाराजांचा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा, यासाठी शिवाजी महाराजांची प्रतिमा देशभर प्रमुख ठिकाणी लावलेली दिसते़ असाच एक तेरा फुटी अश्वारुढी शिवाजी महाराजांची मूर्र्ती आता मध्यप्रदेश मध्ये बसवण्यात येणार आहे़ ही मूर्ती सोलापुरातील शिल्पकार नितीन जाधव यांनी तयार केली आहे.

मध्यप्रदेशमधील बुºहाणपूरमधील शहापूर नगरपालिकेमध्ये सोलापुरात तयार केलेली ही शिवाजी महाराजांची मूर्ती बसवण्यात येणार आहे़ ही मूर्ती तयार करण्यासाठी जाधव यांच्यासह चौघांनी तीन महिने परिश्रम घेतले़ ही मूर्ती अश्वारुढ असून, १३ फूट उंच, ५ फूट रुंद, लांबी १४ फूट आहे़ मूर्ती तयार करताना प्रथम मातीमध्ये तयार करून नंतर मोल्डिंग करण्यात आले़ यानंतर फायबरमध्ये ही मूर्ती तयार करण्यात आली.

तयार करण्यात आलेली मूर्ती अश्वारूढ असून, शिवाजी महाराज हे एका हाताने घोड्यावर लगाम लावत आहेत तर दुसºया हातामध्ये म्यानामध्ये असलेली तलवार आहे़ शिवाजी महाराजांचा घोडा  रुबाबदार असून घोडा धावता असून यावेळी घोड्याला लगाम लावल्यामुळे घोडा थांबला आणि  त्याच्या शरीरातील ताकद यावेळी दिसत आहे़ या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे शिवाजी महाराज यांच्या हातामधील तलवार ही म्यानामध्ये आहे. कारण शिवाजी महाराजांकडे सैनिक असायचे़ प्रत्येक वेळी तलवार काढावी लागत नसे अशा स्वरूपाची रचना शहापूरच्या नगरपालिकेकडून सांगण्यात आली.

 यानुसारच ही मूर्ती तयार करण्यात आली आहे़ ही मूर्ती मध्यप्रदेशातील शहापूरमध्ये चौकात बसवण्यात येणार आहे़ याचे उद्घाटन लवकरच करण्यात येणार आहे़ ही मूर्ती बनवण्यासाठी शुभम पिपंळकर, रोहित साळुंखे, विनोद भोसले यांनी ही परिश्रम घेतले आहे़

खºया अर्थाने माझे स्वप्न पूर्ण झाले: नितीन जाधवशिवाजी महाराजांची मूर्ती आपण बनवावे असे सर्वच मूर्तीकारांचे स्वप्न असते़ आज हे स्वप्न माझे पूर्ण झाले आहे़ ही मूर्ती बनवण्यासाठी आम्हाला तीन महिने लागले़ ही मूर्ती शनिवारी सायंकाळी शहापूरकडे रवाना झाल्याचे शिल्पकार नितीन जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मध्यप्रदेशात मूर्तीची प्रतिष्ठापना ही सोलापूरकरांना अभिमान वाटावी, अशीच आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरMadhya Pradeshमध्य प्रदेशShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज