शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

‘ईपीएफ’चा प्रश्नी यंंत्रमागधारकांनी घेतली केंद्रीय श्रममंत्र्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 14:47 IST

सोलापूर दि २१ : यंत्रमाग कामगारांना लागू करण्यात आलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) संदर्भात यंत्रमागधारकांच्या मागणीवर अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल, असे केंद्रीय श्रममंत्री बंडारू दत्तात्रय यांनी रविवारी हैदराबाद येथे स्पष्ट केले.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २१ : यंत्रमाग कामगारांना लागू करण्यात आलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) संदर्भात यंत्रमागधारकांच्या मागणीवर अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल, असे केंद्रीय श्रममंत्री बंडारू दत्तात्रय यांनी हैदराबाद येथे स्पष्ट केले.यंत्रमाग कामगारांना ईपीएफ लागू केल्याप्रकरणी यंत्रमागधारकांनी गेल्या चार दिवसांपासून बेमुदत बंद पुकारला आहे. हा आदेश मागे घेऊन संपूर्ण देशातील यंत्रमाग उद्योग वाचवावा या मागणीसाठी सोलापूरच्या यंत्रमागधारकांनी खा. शरद बनसोडे यांच्या माध्यमातून बंडारू दत्तात्रय यांची हैदराबादेत भेट घेऊन निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी वरील आश्वासन दिले. दत्तात्रय यांनी हा विषय केवळ सोलापूरपुरता नसून संपूर्ण देशातील यंत्रमाग कामगारांचा आहे. यावर तज्ज्ञ व्यक्तींना अभ्यासासाठी नेमून यावर निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. यंत्रमागधारकांनी श्रममंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यंत्रमाग उद्योग हा मायक्रो (सूक्ष्म) इंडस्ट्रीत मोडतो. हा उद्योग ३० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात कामगारांवर अवलंबून आहे. कमी नफ्यावर चालणाºया या उद्योगात लेबर चार्जेसवर बोजा वाढल्यास मोठ्या प्रमाणावर आर्थिक परिणाम होतो. अशा आर्थिक अडचणीत असलेल्या उद्योगासाठी सेक्शन १६ नुसार विशेष अधिसूचना काढून ईपीएफचा आदेश रद्द करण्यात येऊ शकतो. अशी अधिसूचना केंद्राने काढून यंत्रमाग उद्योगाला जीवदान द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.या भेटीप्रसंगी खा. शरद बनसोडे, यंत्रमागधारक संघाचे प्रेसिडेंट धर्मण्णा सादूल, अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, राजू राठी, श्रीनिवास दायमा, नागेश वल्याळ, मल्लिकार्जुन कमटम, रामचंद्र जन्नू आदी उपस्थित होते.------------------------ आज बंदबाबत फैसलाकेंद्रीय श्रममंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर  सोमवारी सकाळी ११ वाजता सोलापूर यंत्रमागधारक संघात कारखानदारांची बैठक बोलाविण्यात आली आहे. यामध्ये बेमुदत बंद सुरू ठेवायचा की मागे घ्यायचा याविषयी निर्णय घेण्यात येणार असल्याचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी सांगितले.