शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात मघा नक्षत्राचा सर्वदूर पाऊस, खरिपाला दिलासा : शेतकरी वर्ग सुखावला;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 14:52 IST

सोलापूर दि २१ : अनेक दिवसांनंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने मघा नक्षत्रात शनिवारी सायंकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. शनिवारी सायंकाळपासून सुरु झालेल्या या पावसाची रिपरिप रविवारी सकाळपर्यंत सुरुच होती. मघा नक्षत्राच्या पावसाने शेतकºयांसह खरिपाला दिलासा दिला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत बसलेला बळीराजा या पावसाने सुखावला आहे. सोलापूर शहरातही मघा नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावली

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २१ : अनेक दिवसांनंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने मघा नक्षत्रात शनिवारी सायंकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. शनिवारी सायंकाळपासून सुरु झालेल्या या पावसाची रिपरिप रविवारी सकाळपर्यंत सुरुच होती. मघा नक्षत्राच्या पावसाने शेतकºयांसह खरिपाला दिलासा दिला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत बसलेला बळीराजा या पावसाने सुखावला आहे. सोलापूर शहरातही मघा नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला, करमाळा, बार्शी, माढा, मोहोळ, अक्कलकोट, उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात मघा नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावली आहे. भिज पाऊस म्हणून मघाने लावलेल्या हजेरीने शेतकºयांच्या चेहºयावर कमी प्रमाणात का होईना आनंद दिसत आहे. जूनच्या पहिल्या सप्ताहानंतर पडलेल्या पावसाने दडी मारली. पाऊस थांबल्याने गावागावांमधील विहिरी आटू लागल्या होत्या तर हातातोंडाला आलेली पिके माना टाकू लागल्या होत्या. या पावसाने नाले, ओढे, विहिरीत पाणी आले असून, खरीप पिकांना तूर्त तरी जीवदान मिळाले आहे. -----------------सांगोल्यात सर्वत्र संततधार सांगोला : ‘अखेर’ मघा नक्षत्र पावले असून, शनिवारी मध्यरात्रीपासून सांगोला शहर व तालुक्यात पावसाची संततधार सुरू होती़ या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा तर मिळालाच पण रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. १२ तासांहून अधिक झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. बैलपोळा सणाच्या पूर्वसंध्येला मघा नक्षत्राचा पाऊस पडल्यामुळे रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मघा नक्षत्र २८ आॅगस्टपर्यंत असल्याने या कालावधीत पर्जन्यवृष्टी होणार असल्याचे संकेत हवामान खात्याने वर्तवले आहे. -----------------मोहोळमध्ये शेतकरी आनंदीमोहोळ : दीर्घ विश्रांतीनंतर तालुक्यात सर्वदूर पडलेल्या मघा नक्षत्राच्या पावसाने शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. उडीद, मका, तूर, सोयाबीन आदी खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. मृग नक्षत्राच्या दमदार सुरुवातीनंतर दोन वर्षांच्या दुष्काळाच्या झळा विसरायला लावल्या होत्या. त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी मशागती करून ठेवल्या होत्या. काहींनी खरीप पेरण्या केल्या तर काही शेतकºयांनी उसाची जोरदार तयारी केली होती. काही शेतकºयांनी कांद्याची रोपे टाकली आहेत. सध्या कांद्याचा चढता भाव लक्षात घेता कांद्याची जास्तीत जास्त लागवड होईल हा अंदाज करीत तसे नियोजन केले होते .--------------अक्कलकोटमध्ये २३ मि. मी. पाऊसअक्कलकोट : शनिवारी रात्रीपासून अक्कलकोट शहर व तालुक्यात झालेल्या रिमझिम पावसाने बळीराजाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तडवळे मंडळात सर्वाधिक २३ मि़मी़ पावसाची तर करजगी मंडळात केवळ दोन मि़मी़ पावसाची नोंद झाली असून, रविवारी दिवसभर तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच होती. जून महिन्यात वेळेवर पावसाचे आगमन झाल्याने खरीप पेरणी वेळेवर झाली अन् पिकेही जोमाने आली. मात्र त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके माना टाकू लागल्या. त्यामुळे या परिसरातील शेतकरी हवालदिल झाला होता. पेरणीनंतर गायब झालेल्या पावसामुळे शेतकºयांच्या हातून खरीप हंगाम निसटला असला तरी जनावरांच्या चारा-पाण्यासाठी पावसाची अत्यंत गरज होती. अक्कलकोटला १४ मि़मी़, चपळगावला १३, वागदरीला १६ मि़मी़, किणीला १५, मैंदर्गीला १३, दुधनीला १४ मि़मी़, जेऊरला ७ , तडवळे मंडळात २३ मि़मी़ तर करजगी येथे दोन मि़मी़पावसाची नोंद झाली आहे. रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने बळीराजा सुखावला आहे. दरम्यान रब्बी हंगामासाठी मोठ्या पावसाची गरज असल्याचे शेतकºयांतून बोलले जात आहे. --------------माढा तालुक्यात वीजपुरवठा खंडितमाढा : शहर व परिसरात शनिवारी रात्रीपासून सुरु झालेली पावसाची रिपरिप रविवारी दिवसभर सुरु होती. माढा तालुक्यात  सर्वदूर पाऊस पडला. शनिवारी पाऊस पडत असताना तालुक्यातील काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. माढा शहर व परिसरातील शेतकरी पावसाची वाट पाहत बसले होते. शेतातील पिके पाण्याअभावी जळून चालले होते. शनिवार व रविवारी सरासरी २० तास पाऊस सुरु होता़ बैलपोळ्याच्या मुहूर्तावर पावसाने आगमन केल्याने शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्यात इतर भागातही संततधार पाऊस झाल्याचे वृत्त आहे.