शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मार्चअखेर ; सोलापूर जिल्ह्यातील जमा-खर्चाच्या लेखांची पडताळणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 12:46 IST

जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांनी कोषागार कार्यालयात जाऊन केली पाहणी, घेतला कामाचा आढावा

ठळक मुद्देडॉ. भोसले यांनी कार्यालयातील अग्निशमन यंत्रणेचे प्रात्यक्षिक घेतलेकोषागार कार्यालयातील कर्मचारी सायंकाळी उशिरापर्यंत काम करत आहेत

सोलापूर : मार्चअखेरच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्हा मुख्य कोषागार कार्यालयाला भेट दिली. जिल्ह्यातील जमा-खर्चाच्या लेखांची पडताळणी केली.

जिल्हाधिकारी दरवर्षी कोषागार कार्यालयाची पाहणी मार्च महिन्यात करत असतात. त्यानुसार  जिल्हाधिकारी डॉ. भोसले हे कोषागार कार्यालयात दाखल झाले. कोषागार अधिकारी राहुल कदम यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाचे सहायक संचालक धनराज पांडे, सहायक कोषागार अधिकारी सुर्यकांत खटके उपस्थित होते.

डॉ. भोसले यांनी मुद्रांकाची पाहणी केली. सर्व विभागाच्या वित्तपेट्या, मौल्यवान वस्तूंच्या पेट्या, निवडणूक पेट्या यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला. कोषागार कार्यालयाची यंत्रणा कशा प्रकारे चालते. आॅनलाईन यंत्रणा कशा प्रकारे हाताळली जाते याचे प्रात्यक्षिक घेतले.  कदम यांनी यंत्रणा युझर फ्रेंडली असल्याचे निदर्शनास आणून दिले.

रात्री उशिरापर्यंत काम सुरु- मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यापासूनच कोषागार कार्यालयातील कर्मचारी सायंकाळी उशिरापर्यंत काम करत आहेत. झीरो पेन्डन्सी धोरणानुसार काम रोजच्या रोज पूर्ण केले जात आहे. या कामकाजाबाबत डॉ. भोसले यांनी समाधान व्यक्त केले. तसेच अभिलेख कक्ष, निवृत्तीवेतन विभाग, ग्रंथालय, धनादेश विभाग आदी विभागांना भेट देऊन सायंकाळी साडेसातच्या सुमारास जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सर्वांचा निरोप घेतला. 

अग्निशमन यंत्रणेचे प्रात्यक्षिक- भेटीदरम्यान डॉ. भोसले यांनी कार्यालयातील अग्निशमन यंत्रणेचे प्रात्यक्षिक घेतले. कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत अग्निरोधक चाचणी डॉ. भोसले यांनी घेतली. आपत्ती व्यवस्थापनासाठी नेहमी सज्ज राहावे, अशी सूचना त्यांनी सर्वांना केली.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय