शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

करवसुलीतून होणार सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचाºयांचा पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 11:32 IST

मनपा आयुक्त अविनाश ढाकणे यांची माहिती, जीएसटी अनुदान न आल्यास होणार पंचाईत

ठळक मुद्देजीएसटी अनुदानावर मनपा कर्मचाºयांचा पगार व वीज बिल भागविले जातेमार्च अखेर असल्याने यावेळेस जीएसटी अनुदानात सोलापूर महापालिकेचे नावच आलेले नाहीफेब्रुवारी महिन्याचा पगार कधी होणार याची शाश्वती नाही

सोलापूर : मार्च महिन्याचा पगार मिळकतकर वसुलीतून करणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी मंगळवारी दिली. जीएसटी अनुदानावर मनपा कर्मचाºयांचा पगार व वीज बिल भागविले जाते. त्यामुळे दरमहा शासनाकडून जीएसटी अनुदानापोटी मिळणारे १८.५० कोटी कधी जमा होतात, याची कर्मचाºयांना वाट पहावी लागते. मार्च अखेर असल्याने यावेळेस जीएसटी अनुदानात सोलापूर महापालिकेचे नावच आलेले नाही. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा पगार कधी होणार याची शाश्वती नाही.

मनपाने यापूर्वीच करवसुली मोहीम राबविल्याने दररोजच्या खर्चासाठी तिजोरीत पैसे जमा होत आहेत. त्यातून देणी व विकासकामांना खर्च केला जात आहे. जीएसटी अनुदानाच्या भरवशावर कर्मचाºयांचा पगार राहिला तर भविष्यात अनेक अडचणी येणार आहेत. याशिवाय दुसरी बाजू म्हणजे अनुदानावर पगार भागविला जात असल्याने कर्मचारी करवसुलीकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसून आले आहे. पगारच करवसुलीवर ठेवला तर कर्मचारी आणखीन काळजीने काम करतील, असे दिसून आल्याने हा निर्णय घेतल्याचे आयुक्त डॉ. ढाकणे म्हणाले. मनपा प्रशासनाला दरमहा पगारासाठी १५.५० कोटी, वीज बिलासाठी तीन कोटी आणि दररोजच्या खर्चासाठी १० कोटी असे जवळजवळ २८ कोटींची तिजोरीत तजवीज ठेवावी लागते. यातून जीएसटीचे अनुदान जमा झाले नाही तर खर्चाचा ताळमेळ घालणे अवघड होऊन जाते. मार्च अखेर जवळ आला असून, करवसुलीचे उद्दिष्ट जवळजवळ ७२ टक्के झाले आहे. वेळोवेळी मोहीम हाती घेतल्याने करवसुली वाढली आहे. थकीत कराचा आकडा मोठा दिसत असला तरी त्यात फुगलेली बाकी जास्त आहे. एकाच मालमत्तेची दोन बिले दिसून येत आहेत. चुकीची आकारणी रद्द करून मिळकतकराच्या यादीत वेळोवेळी सुधारणा करण्यावर भर दिला जाणार आहे. 

मोहीम आणखी तीव्र होणारच्करवसुलीवर मनपाच्या कर्मचाºयांचा पगार करण्यात येणार असल्याने ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे. केवळ कर्मचाºयांचा पगार नव्हे तर अधिकाºयांनाही करवसुलीचे उद्दिष्ट पार केल्याशिवाय पगार मिळणार नाही. ज्या भागातून वसुलीचे उद्दिष्ट झालेले नाही व कर्मचारी वारंवार जाऊनही वसुली होत नाही, अशा ठिकाणी वरिष्ठ अधिकारी ठाण मांडून बसणार आहेत. कर्मचाºयांवर हल्ले करणाºयांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाBudgetअर्थसंकल्प