शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

सोलापुरात २ फेब्रुवारीपासून इलेक्ट्रो २०१८ प्रदर्शन, खुशालचंद देढिया यांची माहिती,  सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनचे आयोजन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 16:08 IST

सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनद्वारा इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, टेलिकम्युनिकेशन व होम अ‍ॅप्लायन्सेस वस्तूंचे भव्य प्रदर्शन ‘इलेक्ट्रो २०१८’चे आयोजन केले आहे.

ठळक मुद्दे६ दिवस चालणाºया इलेक्ट्रो २०१८ या प्रदर्शनाचे हे १९ वे वर्षसेडातर्फे आयोजित केलेल्या इलेक्ट्रो २०१७ ला स्टॉलधारकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलास्टॉलचे बुकिंग ३०० पर्यंत पोहोचले असून जवळपास १.५ लाखांपेक्षा जास्त ग्राहक प्रदर्शनास भेट देतील

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३० : सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनद्वारा इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, टेलिकम्युनिकेशन व होम अ‍ॅप्लायन्सेस वस्तूंचे भव्य प्रदर्शन ‘इलेक्ट्रो २०१८’चे आयोजन केले आहे. २ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत सोलापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हरिभाई प्रशालेच्या मैदानावर हे प्रदर्शन आयोजित केल्याची माहिती सेडाचे अध्यक्ष खुशालचंद देढिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.यंदा सॅमसंग मोबाईल हे मुख्य प्रायोजक असून चेफ प्रो होम अप्लायन्सेस, सुपर सेक्युर, एस. एस. कम्युनिकेशन व अग्रवाल्स श्री विद्या अ‍ॅकेडमी हे सहप्रायोजक आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता आकाश बारबारिया नॅशनल हेड, एच. डी. बी. फायनान्सियल सर्व्हिस लि. व सॅमसंगचे गोविंद उत्तमचंदनानी यांच्या हस्ते होणार असल्याचे इलेक्ट्रोचे चेअरमन जितेंद्र राठी यांनी सांगितले.६ दिवस चालणाºया इलेक्ट्रो २०१८ या प्रदर्शनाचे हे १९ वे वर्ष असून दररोज दुपारी ४ ते रात्री ९.३० व रविवारी सकाळी ११ ते रात्री ९.३० पर्यंत चालणाºया या प्रदर्शनात राष्टÑीय व आंतरराष्टÑीय कंपन्यांचा सहभाग असून एलसीडी, एलईडी, कलर टीव्ही, फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, एअर कंडिशनर, म्युझिक सिस्टीम, गॅस गीझर, मोबाईल, आय पॅड, टेलिफोन, हेल्थ इक्विपमेंट, मिक्सर, फूड प्रोसेसर, आटा चक्की, एअर कुलर, वॉटर प्युरिफायर, स्टॅबिलायझर, कॉम्प्युटर, कॉम्प्युटरला लागणारी उपकरणे आदी उपलब्ध असतात. ग्राहकांना विविध नमुन्यात व विविध रंगात आकर्षक किमतीत निरनिराळ्या योजनांखाली वस्तू खरेदी करता येतात. तसेच बजाज फायनान्स, एचडीबी व एचडीएफसी फायनान्सच्या माध्यमातून शून्य टक्के व्याज दराने कर्जाची उपलब्धता केली जाते.सेडातर्फे आयोजित केलेल्या इलेक्ट्रो २०१७ ला स्टॉलधारकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. यावर्षी स्टॉलचे बुकिंग ३०० पर्यंत पोहोचले असून जवळपास १.५ लाखांपेक्षा जास्त ग्राहक प्रदर्शनास भेट देतील. या प्रदर्शनात ठिकठिकाणी ग्राहकांना बसण्याची सोय तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. दररोज लकी ड्रॉ व शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉद्वारे भेट देणाºया ग्राहकांना विविध आकर्षक बक्षिसे दिली जातात. सर्व स्टॉलमध्ये जवळपास ४०० एम. बी. ए. च्या विद्यार्थ्यांना कंपनीकडून ट्रेनिंग देऊन ग्राहकांना माहिती देण्यात येणार आहे. प्रदर्शनाच्या संयोजनासाठी सेडाद्वारे विशेष समिती कार्यरत आहे. पत्रकार परिषदेस इलेक्ट्रोचे उपाध्यक्ष ईश्वर मालू, सचिव सूरजरतन धूत, आनंद येमूल, खजिनदार भूषण भुतडा, संचालक सुयोग कालाणी, विजय गोसकी, आनंद मनवाणी, केतन शाह, आनंदराज दोशी, दीपक मुनोत, शिवप्रकाश चव्हाण, बिपीन कुलकर्णी, कौशिक शाह आदी उपस्थित होते.------------------धूळमुक्तीसाठी मॅटिंगची सोययंदाचे प्रदर्शन वैविध्यपूर्ण असून स्टॉलधारक आणि प्रेक्षकांसाठी विविध सोयी उपलब्ध करण्यात येणर असून यामध्ये विविध प्रकारचे कारंजे, धबधबे, खवय्यांसाठी फूड कोर्ट आदी सोयी असणार आहेत. धूळमुक्तीसाठी संपूर्ण मैदानावर मॅटिंगची सोय केली आहे. दिव्यांग व्यक्तींनाही प्रदर्शन अनुभवता येणार आहे. त्यासाठी व्हील चेअरची सोय केली आहे. प्रेक्षक आणि स्टॉलधारक यांच्या सुरक्षिततेसाठी फायर ब्रिगेड तसेच सिक्युरिटी गाडर््सही नेमले आहेत. सेडातर्फे प्रदर्शनादरम्यान दररोज रक्तदानाचा उपक्रम घेतला जाणार आहे. संपूर्ण प्रदर्शन जास्तीत जास्त डिजिटल कसे होईल, यावर कटाक्ष असल्याचे सांगण्यात आले.--------------सामाजिक संस्थांना चार स्टॉल मोफतसेडातर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्यात सेडाच्या सभासदांच्या कर्मचाºयांसाठी शैक्षणिक व आर्थिक मदतही करण्यात येते. कर्मचारी प्रशिक्षणासह व्यवसाय वृद्धीसाठी कार्यशाळेचे आयोजन केले जाते. या प्रदर्शनातही ४ स्टॉल सामाजिक संस्थांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुक संस्थांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूर