शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर, ५ डिसेंबरपासून अर्ज भरा; २६ डिसेंबरला होणार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 12:59 IST

जानेवारी-फेब्रुवारी २०१८ या कालावधीत मुदत संपणाºया जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केला.

ठळक मुद्देया ग्रामपंचायतींसाठी २६ डिसेंबरला मतदान होणार जिल्ह्यातील १९२ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया नुकतीचयावेळीही थेट जनतेतून सरपंच निवड होणार

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १८ : जानेवारी-फेब्रुवारी २०१८ या कालावधीत मुदत संपणाºया जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केला. यामध्ये माढा तालुक्यातील टेंभुर्णी, तुळशी, करमाळा तालुक्यातील जेऊर, माळशिरस तालुक्यातील माळीनगर अशा मोठ्या ग्रामपंचायतींचाही समावेश आहे. या ग्रामपंचायतींसाठी २६ डिसेंबरला मतदान होणार आहे. जिल्ह्यातील १९२ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. नव्याने ६४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. मागील निवडणुकीप्रमाणे यावेळीही थेट जनतेतून सरपंच निवड होणार आहे. या निवडणुकीसाठी मंगळवेढा अािण करमाळा तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

--------------------------या ग्रामपंचायतींची निवडणूक होणार पंढरपूर : ईश्वर वठार. माढा : अंजनगाव खे., पिंपळखुंटे, आढेगाव, वडशिंगे, अंबाड, लोणी/नाडी, मुंगशी, कन्हेरगाव, तुळशी, वडोली, चांदज, टेंभुर्णी. माळशिरस : माळीनगर, धर्मपुरी, कारुंडे, वाफेगाव. मंगळवेढा : शिरसी, अकोला, खडकी, जंगलगी, जुनोनी, खुपसंगी, महमदाबाद (हुन्नूर), बठाण, आंधळगाव, शेलेवाडी, उचेठाण, ब्रह्मपुरी, निंबोणी, जालीहाळ/सिद्धनकेरी, मुंढेवाडी, नंदूर, भाळवणी, चिकलगी, हिवरगाव, दक्षिण सोलापूर : गावडेवाडी, शिरवळ, कासेगाव, कुसूर/खानापूर, दोड्डी, वळसंग. अक्कलकोट : दहिटणे, हसापूर, जेऊरवाडी. बार्शी : उंडेगाव, मुंगशी (वा), आंबाबाईची वाडी, सांगोला : खवासपूर, सावे, चिकमहूद/बंडगरवाडी. करमाळा : राजुरी, भगतवाडी/गुलमरवाडी, जेऊर, गौंडरे, उंदरगाव, कोर्टी/हुलगेवाडी, चिखलठाण,  कंदर, निंभोरे,  वीट, केत्तूर,  रामवाडी, घोटी. ------------------असा असेल निवडणूक कार्यक्रम २४ नोव्हेंबर रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध होणार. ५ डिसेंबर ते ११ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत, १२ डिसेंबरला उमेदवारी अर्जांची छाननी, १४ डिसेंबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत व चिन्ह वाटप, २६ डिसेंबरला मतदान आणि २७ डिसेंबरला मतमोजणी. 

टॅग्स :ElectionनिवडणूकSolapurसोलापूर