शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सहकार विकास महामंडळाच्या पुनरूज्जीवनासाठी प्रयत्न सुरू; सहकारमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 12:00 IST

सोलापुरात पतसंस्थांची बैठक : १  कोटी रूपयांचे भागभांडवल जमा

ठळक मुद्दे जिल्ह्यातील पतसंस्थांनी १ कोटी रूपयांचे भागभांडवल जमा केले महामंडळाची नोंदणी रद्द करण्याची नामुष्की ओढावलीसरकारने महामंडळाच्या पुनरूज्जीवनाचा निर्णय घेतला

सोलापूर : कंपनी कायद्याखाली अठरा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या महाराष्टÑ राज्य सहकार विकास महामंडळाच्या पुनरूज्जीवनाचे प्रयत्न सरकारने सुरू केले असून, यासाठी राज्यभरातून सहकारी संस्था, पतसंस्था आणि व्यक्तींकडून भागभांडवल जमा करून घेतले जात आहे. सोलापुरात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील पतसंस्थांनी १ कोटी रूपयांचे भागभांडवल जमा केले आहे.

सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात ही बैठक झाली. सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर, महामंडळाचे कार्यकारी संचालक मिलिंद आकरे, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांच्यासह सुमारे ८० पतसंस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत प्रारंभी देशमुख यांनी सहकारी संस्था आणि व्यक्तींनी महामंडळात भागभांडवल ठेवण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत १ कोटी रूपये जमा झाले.

या बैठकीनंतर ‘लोकमत’शी बोलताना चरेगांवकर म्हणाले की, सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी सहकार विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री महामंडळाचे अध्यक्ष होते; पण तत्कालीन सरकारचे याकडे दुर्लक्ष झाले. चौदा वर्षे त्याचे लेखापरीक्षण झाले नव्हते. महामंडळाची नोंदणी रद्द करण्याची नामुष्की ओढावली होती; पण या सरकारने महामंडळाच्या पुनरूज्जीवनाचा निर्णय घेतला. लेखापरीक्षण करून घेतले. 

आता भागभांडवल जमा करून घेतले जात आहे. सहकार मंत्री हे आता या महामंडळाचे अध्यक्ष असून, विभागीय सहनिबंधक दर्जाच्या अधिकाºयाकडे कार्यकारी संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सहकारी संस्थांच्या पैशातून सहकारी संस्थांचे सक्षमीकरण करणे हा उद्देश ठेवून महामंडळाचे बळकटीकरण केले जात आहे. बदलत्या काळानुसार सहकार मंत्री देशमुख यांनी महामंडळाच्या कामकाज पध्दतीतही बदल केला असल्याचे चरेगांवकर यांनी सांगितले.

सहकार मंत्र्यांकडून ११ लाखांचे भागभांडवलसोलापूर जिल्ह्यात एक हजाराहून अधिक सहकारी पतसंस्था आहेत. या पतसंस्थांकडून अधिकाधिक भागभांडवल जमा करून घेण्याचा मानस सहकार मंत्र्यांनी व्यक्त केला. शिवाय व्यक्तींकडून भागभांडवल जमा करून घेण्यात येत असल्याचे सांगून सहकार मंत्र्यांनी स्वत:चे ११ लाख रूपये या महामंडळात जमा केले.

महामंडळांचे कार्य सहकारी संस्थांना सल्ला देणेसहकारी संस्थांच्या बचत गटाने तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणेविविध कार्यकारी सोसायट्यांना गोदाम, शेतीपूरक अवजारे पुरविण्यासाठी आर्थिक सहकार्य करणेतंत्रज्ञानाचे हब तयार करून त्याचा लाभ संस्थांना पोहोचविणे

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखBanking Sectorबँकिंग क्षेत्र