शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पा अन् लक्ष्मीच्या सजावटीसाठी माटीगाडाची इकोफ्रेंडली फळे सोलापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 15:29 IST

प्रत्यक्ष फळांपेक्षाही आकर्षक; पश्चिम बंगालमधील मातीची भांडी बनविण्यासाठी प्रसिद्ध गाव

ठळक मुद्देपश्चिम बंगालमधील सिलीगुडी जिल्ह्यातील माटीगाडा हे गाव मातीच्या सर्व वस्तू बनविण्यासाठी प्रसिद्ध गावातील घराघरांत अशा मातीच्या वस्तू, खेळणी, फळे, शोभेच्या मूर्ती, वॉल पीस, विविध कलात्मक वस्तू पाण्यात सहज विरघळणाºया इकोफ्रेंडली वस्तू यंदाच्या उत्सवात सोलापूरकरांना विक्रीसाठी उपलब्ध

यशवंत सादूल

सोलापूर : पश्चिम बंगालमधील सिलीगुडी जिल्ह्यातील माटीगाडा हे गाव मातीच्या सर्व वस्तू बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे. संपूर्ण गावातील घराघरांत अशा मातीच्या वस्तू, खेळणी, फळे, शोभेच्या मूर्ती, वॉल पीस, विविध कलात्मक वस्तू येथे बनविल्या जातात. 

सोलापुरातील भाविकांना काहीतरी वेगळे द्यायचे या उद्देशाने ही फळे सोलापुरात भीमण्णा जाधव यांनी आणले आहेत. यामध्ये लक्ष्मी व गणपतीच्या सजावटीसाठी सिलीगुडी येथून मातीच्या रंगीबेरंगी फळे, भाज्या, शोभेच्या मूर्ती, घंटी आणल्या आहेत. या सर्व वस्तूंमध्ये इतके साम्य आहे की, प्रत्यक्ष फळे आणि या मातीच्या फळांमधील फरक हाताने स्पर्श करून पाहिल्याशिवाय कळणार नाही.

हुबेहूब दिसणाºया या वस्तूंची रंगसंगतीसुद्धा संभ्रमात टाकणारी आहे. ही फळे घेण्यासाठी ग्राहक जुनी फौजदार चावडीजवळील भीमण्णा जाधव बंधूंच्या स्टॉलवर हजेरी लावून उत्सुकतेने चौकशी करत आहेत. काही ग्राहक टोपल्यातील कांदे, लसूण पाहून कसे किलो आहेत, असे विचारताना दिसून आले. बाप्पा, लक्ष्मीसमोर आरास, शोभेसाठी ठेवण्यात येणारी ही मातीची फळे आहेत, असे सांगितल्यावर मात्र ग्राहक त्यांना स्पर्श करून फळे, वस्तू न्याहाळताना दिसून येत आहेत. त्यांची रंगसंगतीही मिळतीजुळती आहे.

इकोफ्रेंडली फळे अन् वस्तू़...- सीताफळ, संत्रा, पेरू, आंबा, सफरचंद, पपई, डाळिंब, कैरी, आवळा, केळी, कांदा, लसूण, दोडका, वांगी, काकडी, तोंडले, कारले, कोबी, टोमॅटोे यांसह गायवासरू, वाºयासह हलणारी घंटी, गणपती मूर्ती, राधाकृष्ण मूर्ती, हत्ती, उंट, शेठाणी, फुलदाणी, कालिकादेवी मूर्ती, वॉल पीस, बदक व बुद्ध मूर्ती अशा विविध प्रकारच्या आकर्षक रंगसंगतीच्या वस्तू मांडण्यात आल्या आहेत. अगदी नाममात्र दहा ते पंधरा रुपये एका फळाची किंमत आहे, असे गायत्री जाधव यांनी सांगितले.

भारत सरकारच्या सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने सिलीगुडी येथे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी संपूर्ण भारतातील मातीच्या वस्तू तयार करण्यासाठी प्रसिद्ध असणाºया सिलीगुडीजवळ असलेल्या माटीगाडा या गावाला भेट देऊन त्यांची ही कला पाहून भारावून गेलो. पाण्यात सहज विरघळणाºया इकोफ्रेंडली वस्तू यंदाच्या उत्सवात सोलापूरकरांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.- भीमण्णा जाधव, सुंद्रीवादक

टॅग्स :SolapurसोलापूरGanesh Mahotsavगणेशोत्सवGanpati Festivalगणेशोत्सवMarketबाजार