शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

सोलापुरची भिमाई ; तीन बुद्धविहार अन् ३३ बौद्धाचार्यांकडून होतोय जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 11:49 IST

रमाबाई आंबेडकर नगर : मीराताई, प्रकाश, आनंदराज आंबेडकर, जोगेंद्र कवाडेंनी दिल्या भेटी

ठळक मुद्देबुधवार पेठ परिसरात १९७५ साली रमाबाई आंबेडकर नगर वसले़आंबेडकरी विचाराच्या प्रेरणेतून ‘मातोश्री रमाबाई आंबेडकर वाचनालय’ सुरूभारतीय बौद्ध महासभेचे कामकाज १९८० पासून येथून चालते़

काशिनाथ वाघमारे सोलापूर : रमाबाई आंबेडकर नगरातील तीन बुद्धविहारातून बाबासाहेबांच्या विचारांचा जागर होतोय. या बुद्धविहारात ३३ बौद्धाचार्यांकडून नव्या पिढीवर संस्कार आणि धम्म आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर होत आहे. ४३ वर्षांपूर्वीच्या या नगरात मीराताई आंबेडकर, प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर आणि जोगेंद्र कवाडेंपासून चळवळीतील अनेक नेत्यांनी या नगराला भेटी देऊन येथील आंबेडकरप्रेमींशी संवाद साधला आहे.

बुधवार पेठ परिसरात १९७५ साली रमाबाई आंबेडकर नगर वसले़ या नगराने समता सैनिक दलाचे बाबा कांबळे, माजी परिवहन सभापती मल्लप्पा शिंदे, भारतीय बौद्ध महासभेच्या शहर अध्यक्षा धम्मरक्षिता कांबळे, यशवंत साबळे, माजी नगरसेवक सुनीताताई भोसले यांच्यासह डॉक्टर, वकील, पोलीस आणि अनेक उद्योजक दिले़ या साºयांनी आपल्या नगराची वेगळी ओळख निर्माण केली आहे़ १९७८ साली पहिले तरुण मंडळ येथे अस्तित्वात आले़ आंबेडकरी विचाराच्या प्रेरणेतून ‘मातोश्री रमाबाई आंबेडकर वाचनालय’ सुरू झाले आणि आजच्या पिढीच्या जडणघडणीत ते योगदान देणारे ठरले आहे़ तसेच या नगरातील तरुणांनी बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक सलोखा राखणारे रोजा इफ्तार पार्टी, सामुदायिक विवाह असे अनेक उपक्रम राबवित असतात़

आंबेडकर उद्यानातून संघटन - या नगराला दुसरी एक ओळख मिळाली, ती म्हणजे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर उद्याऩ १९९२ साली या उद्यानाच्या उभारणीला सुरुवात झाली़ या नगराला वेस (कमान) नसली तरी आंबेडकर उद्यान हीच सध्याची ओळख आणि प्रवेशद्वार ठरली आहे़ बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानचे अजित गादेकर यांनी या उद्यानाच्या दोन्ही बाजूला नवी कमान व्हावी आणि आणखी एक ओळख मिळावी म्हणून प्रयत्न करताहेत़ उद्यानात आबालवृद्धापासून सारीच मंडळी या ठिकाणी जमतात़ अनेक कार्यक्रमांची आखणी, विचारांची पेरणी या उद्यानातून होते़ त्यामुळे आंबेडकर उद्यान हे सध्या चळवळीचे संघटन केंद्र ठरले आहे.

 चळवळीचे जिल्ह्याचे केंद्रस्थान - या नगरातून अनेकांनी आपली वेगळी ओळख समाजापुढे आणली आहे़ भारतीय बौद्ध महासभेचे कामकाज १९८० पासून येथून चालते़ नामांतराच्या चळवळीत या नगरात राहणारे कै़ शिवाजी कसबे, बबन आहेरकर, मल्लप्पा शिंदे, अर्जुन गायकवाड अशा अनेक आंबेडकरप्रेमींनी सहभाग नोंदविला़ यापैकी शिवाजी कसबे आणि बबन आहेरकर यांना मथुरेत अटक करून दिल्लीच्या जेलमध्ये एक महिना ठेवण्यात आले होते़ या दोघांना झालेली ही शिक्षा समाज आज विसरू शकत नाही़ अशा अनेक चळवळींची चर्चा या नगरात आजही होते़ त्यामुळे रमाबाई आंबेडकर नगर हे आंबेडकरी चळवळीचे केंद्रस्थान बनले.

  • - विशेषत: शिवा-भिवा गायन पार्टी येथे तयार झाली़ राजू गायकवाड, कै़ विजय कांबळे या कलावंतांनी गाण्यातून बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार, प्रसारही केला़ याबरोबरच धम्मगंध बुद्धविहार, आम्रपाली बुद्धविहार आणि रमांजली बुद्धविहार असे तीन विहार उभे झाले़ या विहारातून बाबासाहेबांची शिकवण, विचार, आचरण, त्यांच्या कार्याची महती ३३ बौद्धाचार्यांकडून नव्या पिढीला दिली जाते आहे़ त्यांच्याकडून दररोज पाठांतर आणि विधी सोहळा होतो़
टॅग्स :Solapurसोलापूर