शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
4
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
5
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
6
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
7
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
8
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
9
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
10
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
11
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
12
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
13
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
14
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
15
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
16
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
17
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
18
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
19
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
20
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर

सरकारी रुग्णालयात औषधांची टंचाई !

By admin | Updated: March 4, 2017 12:25 IST

रुग्णांची घालमेल: नव्या अध्यादेशाचा होतोय परिणाम

सरकारी रुग्णालयात औषधांची टंचाई !रुग्णांची घालमेल: नव्या अध्यादेशाचा होतोय परिणामआॅनलाईन लोकमतसोलापूर दि ४ : राज्य शासनाच्या नव्या धोरणामुळे जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात औषधांची टंचाई निर्माण झाली आहे. वातावरण बदलामुळे सध्या व्हायरलचे रुग्ण वाढले असून, डॉक्टरांनाच औषधे जपून वापरण्याची वेळ आली आहे. राज्य शासनाने गृह खाते वगळता सर्व खात्यांना १५ फेब्रुवारीनंतर ३१ मार्चपर्यंत ५0 हजारांपेक्षा जास्त खरेदी न करण्याचा आदेश काढला आहे. याचा फटका आरोग्य खात्याला बसला आहे. आरोग्य विभागातर्फे विभागीयस्तरावर औषध पुरवठा केला जातो. असे असले तरी ऐनवेळी लागणारी तातडीची खरेदी करण्याचा त्या त्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत. पण या नव्या अध्यादेशामुळे आरोग्य विभागाला तातडीची औषधे खरेदी करण्यास अडचण निर्माण झाली आहे. जिल्ह्यात जिल्हा आरोग्य विभागाची प्राथमिक आरोग्य केंद्रे व तालुकास्तरावर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अंतर्गत असलेली तीन उपजिल्हा आणि १४ ग्रामीण रुग्णालये आहेत. त्यात पंढरपूर येथे १00 तर अकलूज व करमाळा येथे ५0 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आहे. फेब्रुवारी महिन्यात तापमानात वाढ झाली आणि आता मार्चमध्ये तापमान कमी-जास्त होत आहे. जिल्ह्यात सुगीचे दिवस असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतात मुक्कामास आहेत. वातावरण बदलाचा फटका बसत असल्याने व्हायरल फिव्हरचे (खोकला, सर्दी, अंगदुखी, थंडी, ताप) रुग्ण वाढले आहेत. उन्हाचा कडाका वाढेल तसा पाण्याचा वापर वाढतो. त्यामुळे पाण्याचे आजार वाढतात. अशा रुग्णांसाठी लागणाऱ्या रिंगर, लॅकटेक्ट, मॅनीटॉल, मेट्रो, आय.बी. सलाईन, पॅरॉसिटीमॉल, डायक्लोफिकच्या गोळ्या अशा औषधांचा साठा संपत आला आहे. त्यामुळे उपचार करणाऱ्या डॉक्टरांना रुग्णांना औषधे देताना भांडाराचा सल्ला घ्यावा लागत आहे. त्यामुळे ग्रामीण स्तरावरून जिल्हा कार्यालयाकडे औषध साठ्याबाबत वारंवार विचारणा होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांनी या समस्येकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे लवकरच ही बंदी शिथिल केली जाईल असे सांगण्यात आले आहे. शासकीय खर्चाला शिस्त लागावी म्हणून शासनाने हा निर्णय घेतला असला तरी गृह खात्याप्रमाणे आरोग्य खात्यालाही यातून वगळावे अशी मागणी होत आहे. -------------------------जिल्हा रुग्णालयाकडे अद्याप पुरेसा औषधसाठा आहे. ग्रामीण रुग्णालय स्तरावर मागणीप्रमाणे गरजेची औषधे उपलब्ध केली जात आहेत. भविष्यात अडचणी उद्भवू नयेत म्हणून नव्या अध्यादेशाबाबत जिल्हा नियोजन बैठकीत चर्चा झाली आहे. -डॉ. मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी,जिल्हा शल्यचिकित्सक