शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

पंढरपुरात कोरोना रुग्णांचे द्विशतक पूर्ण; सोमवारी आढळले ५० जण बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 21:00 IST

१२० जणांचे प्रलंबित अहवाल; आरोग्य विभाग झाला सतर्क

पंढरपूर : सोमवार २० जुलै रोजी २०३ कोरोना रुग्णांचा तपासणी अहवाल आला आहे. त्यामध्ये ८१ जणांचा अहवाल निगेटिव्ह तर ५० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला. यामुळे पंढरपुरातील एकूण बाधितांची संख्या २११ झाली आहे.

२० जुलैपर्यंत १ हजार ७८१ लोकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी १६६१ लोकांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे.  यामध्ये १४५० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्याचबरोबर १२० जणांचे तपासणी अहवाल प्रलंबीत आहेत. तर २११ लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये २ जणांचा मृत्यू झाला आहे. कोविड केअर सेंटरमध्ये १२५ जणांवर तर उपजिल्हा रुग्णालयात २३ जणांवर उपचार सुरु आहेत. त्याचबरोबर सोलापूर - १२, पुणे - १, अकलूज - १, मंगळवेढा १ असे एकूण १५ जण उपचार घेत आहेत.

दरम्यान, रुग्णालयातून बरे होऊन घरी केलेल्या बाधितांची संख्या ४६ आहे. त्याचबरोबर २०५ लोकांना संस्थात्मक कॉरंटाईन करुन ठेवण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.

आज या भागात सापडले कोरोना पॉझिटिव्ह

कालिका देवी चौक, संतपेठ, गांधी रोड, इसबावी, जुनीपेठ रामबाग रोड, आनंद नगर, श्रीराम नगर, मनीषा नगर, महावीर नगर, घोंगडे गल्ली, पोलीस लाईन, उमदे गल्ली, काशी कापडी गल्ली, लक्ष्मीनगर, रोहिदास चौक, हरिनारायण पार्क, ग्रामीण भागामध्ये भोसे, तारापूर, भटूबरे या गावांचा सहभाग आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याPandharpurपंढरपूर