पंढरपूर : चैत्री यात्रा कालावधीत विठ्ठलाच्या गोरगरीब अन् श्रीमंत भाविक भक्तांनी मोठ्या श्रद्धेने श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी लाखो रुपयांचे दान केले आहे. परिणामी चैत्री यात्रेत २ कोटी ५६ लाख ५५ हजार ५५ रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे. मागील यात्रेच्या तुलनेत मंदिर समितीच्या उत्पन्नात यंदा १ कोटी २९ लाख ८१ हजार २६७ रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
चैत्री यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक आले होते.
३० मार्च ते १२ एप्रिल या कालावधीत भाविकांनी विठ्ठलाच्या चरणाजवळ २५ लाख ५९ हजार ९२ रुपये अर्पण, ६३ लाख ९९ हजार ७७९ रुपये देणगी जमा झाली.
२६ लाख २१ हजार रुपये लाडू प्रसाद विक्री, ३४ लाख ३४ हजार ७०८ रुपये भक्तनिवास, २९ लाख २२ हजार १०० रुपये पूजेच्या माध्यमातून, ६४ लाख ८५ हजार २०४ रुपये हुंडीपेटी आल्या.
१ लाख ६४ हजार ७७४ रुपये सोने-चांदी अर्पण तसेच फोटो, महावस्त्रे इतर माध्यमातून १० लाख ६८ हजार ३९८ रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे.