शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिका अन् कारच्या अपघातात डॉक्टरांचा मृत्यू; गारवाडपाटीजवळ अपघात

By काशिनाथ वाघमारे | Updated: November 30, 2023 20:26 IST

सातारा-लातूर महामार्गावर गारवाडपाटी (ता. माळशिरस) येथे रुग्णवाहिका व कारच्या अपघातात एका तरुण डॉक्टरांचा मृत्यू झाला.

 काशिनाथ वाघमारे 

सोलापूर : सातारा-लातूर महामार्गावर गारवाडपाटी (ता. माळशिरस) येथे रुग्णवाहिका व कारच्या अपघातात एका तरुण डॉक्टरांचा मृत्यू झाला. वसंत भोसले (वय ३५, रा. अकलूज, ता. माळशिरस) असे मरण पावलेल्या डॉक्टरांचे नाव असून गुरुवार, ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेदरम्यान हा अपघात झाला.

पोलिस सूत्रांकडील माहितीनुसार अपघातातील रुग्णवाहिका (एम. एच. ११ / सी. एच. ९३२४) ही म्हसवड येथून एका रुग्ण बालकाला घेऊन अकलूजच्या दिशेने निघाली होती. गारवाडपाटी जवळ येताच मांडकीहून अकलूजकडे निघालेली कार (एम.एच. १० / बी. ए. ४३४५) यांच्यात जोरात धडक झाली. या धडकेत कारचालक डॉ. वसंत भोसले (रा. अकलूज) हे गंभीर जखमी झाले. त्यांना अकलूज येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.मांडकी आरोग्य केंद्रावर शोककळा

डॉ. वसंत भोसले हे मांडकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूने वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. मांडकी आरोग्य केंद्रावर शोककळा पसरली आहे. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून याबाबत माळशिरस पोलिसात खबर देण्यात आली आहे.