शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

लोकसभा नको रे बाबा, विधानसभाच बरी ! जि़प. अध्यक्ष संजय शिंदे यांची स्पष्टोक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 15:50 IST

तिसºया आघाडीबाबत अद्याप निर्णय नाही

ठळक मुद्देमी विधानसभा लढविणार हे निश्चित आहे - संजय शिंदेमला राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर इतर पक्षांनीही प्रस्ताव दिला - संजय शिंदेभाजपसोबत जाणार काय, असे विचारले असता तसे अजून काहीच ठरलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले

सोलापूर : लोकसभा नकोरे बाबा, आपल्याला विधानसभाच बरी. कुणाला काय चर्चा करायची करू दे. आपली तयारी करमाळ्याची आहे, अशी प्रतिक्रिया झेडपी अध्यक्ष संजय शिंदे यांनी  दिली. 

ड्रेसकोडवरून शिक्षक संघटना व झेडपी प्रशासनात सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी अध्यक्ष संजय शिंदे यांनी बैठक घेतली. समन्वय समितीच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करून ड्रेसकोडच्या वादावर पडदा पाडला. त्यानंतर त्यांच्या कक्षात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना आगामी लोकसभाविधानसभा निवडणुकीबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली. माढा लोकसभा मतदार संघात भाजपतर्फे समविचारी नेत्यांबरोबर चाचपणी सुरू आहे. यात तुमचे नाव आहे काय, असे  विचारले असता संजय शिंदे यांनी लोकसभेसाठी मी इच्छुक नाही, असे स्पष्ट केले.

 विधानसभा लढवायची हे ठरवून करमाळा मतदार संघात काम सुरू केले आहे. या मतदार संघात १०३ ग्रामपंचायती आहेत. यातील जवळजवळ ४० ते ४५ ग्रामपंचायतींचे सरपंच माझ्या गोटातील आहेत. १५ टक्के लोकांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संपर्क केला आहे. विविध विकासकामांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढविला आहे. त्यामुळे आपल्याला विधानसभाच बरी, असे ते म्हणाले. भाजपतर्फे सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघासाठी इच्छुकांची चाचपणी सुरू आहे. विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याशी संपर्क साधण्यात आल्याची झेडपीत चर्चा आहे. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील हे रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासाठी प्रयत्न करतील, असे बोलले जात आहे. 

त्याचबरोबरीने समविचारी नेत्यांशी संपर्क साधून तिसरी आघाडी स्थापन करून या गोटातील  उमेदवार दिला जाईल का, असे विचारले असता संजय शिंदे म्हणाले की, समविचारी म्हटल्यावर आमच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचाही समावेश होतो. त्यामुळे यातील कोणता नेता ठरविणार. मी लोकसभेसाठी नाही, हे आधीच सांगून ठेवले आहे. त्यामुळे लोकसभेसाठी तिसºया आघाडीबाबत अद्याप तरी निर्णय नाही.

अनेकांचे प्रस्ताव...मी विधानसभा लढविणार हे निश्चित आहे. पण कोणाच्या सोबत जायचे हे अद्याप फायनल नाही. मला राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर इतर पक्षांनीही प्रस्ताव दिला आहे, असे संजय शिंदे यांनी सांगितले. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार प्रशांत परिचारक यांच्यासमवेत जवळीक वाढविली आहे, त्यामुळे भाजपसोबत जाणार काय, असे विचारले असता तसे अजून काहीच ठरलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदlok sabhaलोकसभाvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक