शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

केवळ मस्तानीचे प्रेमवीर म्हणून बाजीरावांकडे पाहू नका, विक्रम एडके यांची माहिती,  शिवछत्रपती व्याख्यानमालेचे सोलापूरात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 16:31 IST

बाजीराव पेशव्यांनी स्वत:च्या आयुष्यात अनेक लढाया लढल्या, पण एकही लढाई ते हरले नाहीत़ ते ४० वर्षे जगले़ वयाच्या २० व्या वर्षी ते सत्तेत आले़ २० वर्षांची पेशवाई कारकीर्द ही देदीप्यमान होती

ठळक मुद्देमराठा समाज सेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी शिक्षण संकुलाच्या प्रांगणात शिवछत्रपती व्याख्यानमालेचे उद्घाटन महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते झाले़ या व्याख्यानमालेचे पहिलेच पुष्प विक्रम एडके यांनी ‘थोरले बाजीराव आणि मराठ्यांची युद्धनीती’ या विषयावर गुंफले़ माणूस जसा अस्मितेच्या जोरावर जगत असतो तसा देशही अस्मितेच्या जोरावर चालत असतो़ छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या देशातील लोकांची अस्मिता जागृत करून स्वराज्य निर्माण केले़ : विक्रम एडके

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १६  : बाजीराव पेशव्यांनी स्वत:च्या आयुष्यात अनेक लढाया लढल्या, पण एकही लढाई ते हरले नाहीत़ ते ४० वर्षे जगले़ वयाच्या २० व्या वर्षी ते सत्तेत आले़ २० वर्षांची पेशवाई कारकीर्द ही देदीप्यमान होती. परंतु आज बाजीराव म्हटले की, मस्तानीचे प्रेमवीर या संकुचित वृत्तीने पाहिले जाते़ मस्तानी आणि बाजीराव यांचा सहवास केवळ दीड वर्षांचा होता़ परंतु या गोष्टीला महत्त्व देऊन त्यांची कारकीर्द झाकोळली जात असल्याची खंत अहमदनगरचे इतिहास अभ्यासक विक्रम एडके यांनी व्यक्त केली़मराठा समाज सेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी शिक्षण संकुलाच्या प्रांगणात शिवछत्रपती व्याख्यानमालेचे उद्घाटन महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते झाले़ या व्याख्यानमालेचे पहिलेच पुष्प विक्रम एडके यांनी ‘थोरले बाजीराव आणि मराठ्यांची युद्धनीती’ या विषयावर गुंफले़ गुरुवारी सायंकाळी पार पडलेल्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, माजी महापौर मनोहर सपाटे यांची प्रमुख उपस्थिती होती़ प्रास्ताविक महेश माने यांनी केले़ अध्यक्षीय मनोगतातून मनोहर सपाटे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा मांडला़ विक्रम एडके पुढे म्हणाले, माणूस जसा अस्मितेच्या जोरावर जगत असतो तसा देशही अस्मितेच्या जोरावर चालत असतो़ छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या देशातील लोकांची अस्मिता जागृत करून स्वराज्य निर्माण केले़ इंग्रजांनी आपली अस्मिता हिरावून घेऊन १५० वर्षे राज्य केले़ विखारी प्रचार करून आपले महापुरुष जाती-पंथामध्ये विभागले़ सूत्रसंचालन प्रा़ शेफाली विभुते यांनी केले तर आभार अ‍ॅड़ सुभाष साळुंखे यांनी मानले़ यावेळी माऊली पवार, प्रा़ महेश माने, विनायकराव पाटील, निवृत्ती केत, हणमंतू बेसुळके, शहाजी सुर्वे, मोहन गोरे, चिंतामणी सपाटे, सुरेश पवार, दत्ता भोसले, उषा लोखंडे, विजया पाटील, अनिल लोंढे, गगन अंकुशे उपस्थित होते़ ------------------------शिवतीर्थ सुशोभीकरणाने वेधले लक्ष४छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोस्टर्स माध्यमातून साकारलेल्या शिवतीर्थच्या सुशोभीकरणाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांच्या हस्ते झाले़ तसेच पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली़ यावेळी जिल्हाधिकारी भोसले यांनी संस्था राबवित असलेल्या सामाजिक उपक्रमातून नव्या पिढीला चांगला आदर्श मिळेल, असे म्हणाले़ यानंतर पोलीस आयुक्त तांबडे यांनी व्याख्यानमालेस शुभेच्छा देत एऩसी़सी़ छात्रांनी केलेल्या संचलनाचे कौतुक केले़ 

टॅग्स :Solapurसोलापूर