शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

हुशार बायको नको रे बाबा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 12:26 IST

मागील सोमवारच्या ‘दुनियादारी’ मध्ये ‘(अति) हुशार नवरा नको गं बाई!’ हा लेख वाचून अनेक वाचकांचे फोन आले. आपल्या ‘लोकमत’चा ...

मागील सोमवारच्या ‘दुनियादारी’ मध्ये ‘(अति) हुशार नवरा नको गं बाई!’ हा लेख वाचून अनेक वाचकांचे फोन आले. आपल्या ‘लोकमत’चा वाचक वर्ग अत्यंत चोखंदळ आहे. एका प्राध्यापिकेने फोन केला. त्या म्हणाल्या, वकीलसाहेब, बहुतेक त्या मुलीच्या आई-वडिलांनी पत्रिका न बघताच तिचे लग्न लावले असेल. मी त्यांना म्हणालो, तुम्ही एवढ्या सुशिक्षित आहात. तरी देखील तुमचा पत्रिका बघून लग्न करण्यावर विश्वास आहे ? त्या म्हणाल्या, अर्थातच. मी त्यांना म्हणालो, पत्रिका बघून लग्न लावलेल्या कित्येक नवरा-बायकोंचा संसार काही महिन्यातच मोडून पडलेला मी बघितला आहे.

सोलापूर-पुणे रेल्वे प्रवासात योगायोगाने शेजारी बसलेल्या तरुण-तरुणीची ओळख होऊन झालेल्या आंतरजातीय प्रेम विवाहातील पती-पत्नी सुखाने संसार करीत आहेत. तर अनेक ज्योतिष तज्ज्ञाकडून पत्रिका तपासून अत्यंत धार्मिक  वातावरणात, थाटामाटात करण्यात आलेले लग्न काही दिवसातच वादळात सापडलेले मी बघितले आहे. फल ज्योतिष्याला कोणताही शास्त्रीय पाया नाही. पत्रिकेचे छत्तीस गुण जमणाºया तरुण पोरीच्या कपाळी वैधव्य आलेले मी बघितले आहे. तर पत्रिका अजिबात न बघता केलेले विवाह यशस्वी झालेले आहेत हे देखील बघितलेले आहे. एक वाचक  मिश्कीलपणे म्हणाला, अति हुशार नवरा नको गं बाई तसे आता अति हुशार बायको नको रे बाबा असा एखादा खटला नाही का ?  मी म्हणालो, पुढच्या सोमवारी वाचा. 

तो आॅफिसला आला. त्याच्या हातात कोर्टाची कागदपत्रे होती. अधिकारी असलेल्या त्याच्या पत्नीने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केलेला होता. नवरा शारीरिक व मानसिक छळ करतो, हुंड्यासाठी जाचहाट करतो असा तिचा आरोप होता. मी त्यास त्याबद्दल विचारले. त्यावेळी तो म्हणाला, यातील शब्द ना शब्द खोटा आहे. मी कधीही तिचा मानसिक अगर शारीरिक छळ केलेला नाही.

एक पैसादेखील मागितला नाही. उलट, मीच तिच्यावर कर्ज काढून हजारो रुपये खर्च केलेले आहेत. त्याचे म्हणणे ऐकून मी स्तब्ध झालो.  मी म्हणालो, मग खरे काय आहे?  तो सांगू लागला, तो सर्वसामान्य घरातील, परंतु कष्टाळू. त्याची आई देखील अत्यंत कष्टाळू. ‘कमवा व शिका’ या योजनेखाली त्याचे महाविद्यालयीन शिक्षण झाले होते. शिक्षणानंतर नोकरी लागली. पगार फार नव्हता. गरीब घरातील पण हुशार मुलीबरोबर त्याचे लग्न झाले. लग्नाच्यावेळी ती सातवी शिकलेली होती. तिची हुशारी पाहून लग्नानंतर त्याने तिला पुढील शिक्षणासाठी शाळेत घातले. एस. एस. सी. परीक्षेला ती प्रथम श्रेणीत आली.  त्यानंतर तिला कॉलेजमध्ये घातले. हुशार असल्याने पदवी परीक्षेत देखील ती प्रथम श्रेणीत आली. स्पर्धा परीक्षा पास होऊन अधिकारी होण्याची इच्छाही तिने बोलून दाखवली. तो तिला घेऊन पुण्याला राहू लागला. पडेल ती कामे करीत होता.  

प्रसंगी पैसे उसने घेऊन त्याने तिची फी भरली. स्पर्धा परीक्षेत तिने यश मिळविले. तिला ‘क्लासवन’ची नोकरी लागली. नोकरीच्या जागी ती रुजू झाली. एका वर्षातच ती त्याच्याबरोबर तुसडेपणाने वागू लागली. कोणत्याही सार्वजनिक समारंभास त्याला बरोबर नेत नव्हती. एवढे कशाला, घरी काही समारंभ असेल तर त्याला तुम्ही सिनेमाला जा, चार-पाच तास येऊ नका असे स्पष्टपणे सांगून त्याचा अपमान करु लागली. अपमान गिळून तो तेथेच राहात होता. तिला आता त्याची लाज वाटत होती. तिने त्याला तुम्ही गावाकडे जाऊन राहा असे सांगून गावाकडे पाठवले आणि घटस्फोटाचा खटला दाखल केला. 

मी त्यास सांगितले, बाबा, असल्या बायकोबरोबर भांडण करण्यास काही अर्थ नाही. तू तिला चांगल्या हेतूने शिकविले, मोठे केलेस, उपकाराची फेड तिने अपकाराने केली. परमेश्वर तिला योग्य शिक्षा देईल. त्याने माझे ऐकले. त्या खटल्यात आम्ही हजर देखील झालो नाही. तिला एकतर्फी घटस्फोट मिळाला. घटस्फोट मिळाल्यानंतर तो भेटण्यास आला. मी त्यास म्हणालो, तुला हे पडलेले वाईट स्वप्न आहे असे समजून नव्या उमेदीने पुढचे आयुष्य चालू ठेव. पुन्हा लग्न कर. सुखाने संसार कर. तो म्हणाला, आबासाहेब, मी निश्चितच आता लग्न करणार आहे. पण हुशार मुलीशी नाही. हुशार बायको नको रे बाबा! असे पुटपुटतच त्याने आॅफिस सोडले.  -अ‍ॅड. धनंजय माने    (लेखक ज्येष्ठ विधिज्ञ आहेत)

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालय