शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत दिलासा; पूरग्रस्तांच्या खात्यात शनिवारपर्यंत पैसे जमा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 13:20 IST

बँक खातेनिहाय यादी तयार; पहिल्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्याला २९४ कोटी ८१ लाखांचा मदतनिधी मिळाला

ठळक मुद्देअतिवृष्टी झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून तालुकानिहाय शेतकऱ्यांच्या नुकसानीत पिकांचे पंचनामे युद्धपातळीवर झालेशेतीपिकांच्या नुकसानीकरिता २५० कोटींचा मदतनिधी जिल्हा प्रशासनाकडे जमा झाला आहेदिवाळीच्या पूर्वसंध्येला सोलापूर जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात २५० कोटींची मदत पूरग्रस्तांना मिळाल्याने पूरग्रस्तांची दिवाळी गोड होणार

सोलापूर : जून ते ऑक्टोबरदरम्यान सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्याला २९४ कोटी ८१ लाखांचा मदतनिधी ९ नोव्हेंबर रोजी दिला आहे. जिल्ह्यातील जवळपास पाच लाख पूरग्रस्त शेतकऱ्यांची यादी बँक खातेनिहाय तयार आहे. मदतनिधी लवकरात लवकर वाटप करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी काढले आहेत. सर्व तहसीलदारांना या संबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गुरुवार, दि. १२ नोव्हेंबरपासून मदतनिधी वाटपाला सुरुवात होणार आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांची यादी संबंधित बँकांकडे सुपूर्द करण्यात येईल. बँकांच्या प्राथमिक तपासणीनंतर बँकेच्या प्रशासनाकडून संबंधित खातेदारांच्या खात्यात पैसे शनिवारपर्यंत जमा होतील.

अतिवृष्टी झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून तालुकानिहाय शेतकऱ्यांच्या नुकसानीत पिकांचे पंचनामे युद्धपातळीवर झाले. पंचनामे करताना संबंधित पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यांची डिटेल माहिती, आधार क्रमांक, बँकेचा पासबुक तसेच इतर तपशील देखील घेण्यात आला. त्यामुळे आता मदतनिधी वाटप करताना फारशी अडचण येणार नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शेतीपिकांच्या नुकसानीकरिता २५० कोटींचा मदतनिधी जिल्हा प्रशासनाकडे जमा झाला आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला सोलापूर जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात २५० कोटींची मदत पूरग्रस्तांना मिळाल्याने पूरग्रस्तांची दिवाळी गोड होणार आहे. जिरायत-बागायत बाधित क्षेत्राकरिता प्रतिहेक्‍टर १० हजार तसेच बहुवार्षिक पिकांकरिता प्रतिहेक्टरकरिता २५ हजारांची मदत राज्य सरकारने अध्यादेशाद्वारे जाहीर केली आहे. एकूण सोलापूर जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीकरिता २५० कोटी, मनुष्यहानी, पूर्णत: घर उद्ध्वस्त, कपडे-भांडी व इतर नुकसानीकरिता १३ कोटी ४४ लाख रुपये, मृत जनावरांकरिता तीन कोटी ३ लाख रुपये आणि पक्क्या घरांच्या झालेल्या नुकसानीबाबत ७ कोटी पाच लाख रुपयांची मदत राज्य सरकारने सोलापूर जिल्ह्याला दिली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरfloodपूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयDiwaliदिवाळी