शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

सोलापूर बाजार समितीच्या आखाड्याकडे जिल्ह्यातील नेत्यांचे लागले लक्ष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 12:28 IST

सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी आमदार दिलीप माने, राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके कोणते डावपेच खेळणार ?

ठळक मुद्देसोलापूर बाजार समितीचा राज्यात लौकिक दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची व्यवस्था

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न समितीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर यातील राजकीय आखाड्याकडे आता जिल्हावासीयांचे लक्ष लागले असून, राज्याचे मंत्री सुभाष देशमुख यांनी ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच राज्यातील बाजार समित्यांमध्ये थेट शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेही निवडणूक लक्षवेधी ठरली आहे.

पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनीही सहकारमंत्र्यांविरोधात रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे प्रमुख शिलेदार दिलीप माने, राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी ही मंडळी या राजकीय आखाड्यात नेमकी कोणते डाव टाकणार याबाबतही उत्सुकता आहे.

सोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत १७ नोव्हेंबर २०१६ रोजी संपली आहे. तत्पूर्वीच बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. प्रशासकाची मुदत साधारणत: वर्षभराची होती, परंतु खास सोलापूरला समोर ठेवून सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. यादरम्यान शासनाने बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या मताधिकाराच्या जोरावरच देशमुख गटाने प्रचाराला सुरुवात केली आहे.

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याविरोधात काँग्रेसचे सर्व नेते एकत्र आले आहेत. शिवसेना आणि इतर पक्षांना त्यांनी सोबत घ्यायचे त्यांचे प्रयत्न आहेत. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनीही स्वतंत्र लढण्याची घोषणा केली असल्याने त्यांनाही सोबत घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. काँग्रेसच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर शेतकरी संघटना निवडणुकीत उतरणार आहेत. एरव्ही शेतकºयांच्या हिताचे प्रश्न फारसे चर्चेला येत नाहीत, परंतु पुढील एक महिन्यात शेतकºयांचे अनेक कैवारी पाहायला मिळणार आहेत. 

उमेदवारासाठी निकष- जी व्यक्ती शेतकरी आहे आणि जी बाजार क्षेत्रात राहत आहे आणि सहकार निवडणूक प्राधिकरणाने विनिर्दिष्ट केलेल्या दिनांकास जिचे वय २१ पेक्षा कमी नसेल अशी व्यक्ती. जिल्हाधिकारी आणि यथास्थिती जिल्हा उपनिबंधक यांनी नियमान्वये अपात्र ठरविलेले नसेल आणि ज्याचे नाव अंतिम मतदार यादीमध्ये समाविष्ट असेल अशी प्रत्येक व्यक्ती शेतकरी मतदारसंघातून घेण्यात येणाºया निवडणुकीसाठी पात्र असेल. व्यापारी मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये असेल अशी प्रत्येक व्यक्ती व्यापारी मतदारसंघातून घेण्यात येणाºया निवडणुकीसाठी पात्र असेल. या निवडणुकीत उमेदवाराला खर्चाचे बंधन नाही. 

दक्षिण तहसील गजबजणार- दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मंगळवार २९ मे ते शनिवार २ जून या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. उमेदवारी अर्जाची फी २०० रुपये आहे. ३ जुलै रोजी रामवाडी गोदामात मतमोजणी होणार आहे. उमेदवारावर खर्चाची मर्यादा नाही. 

१५ गण आणि १ लाख १६ हजार ६२५ मतदार- शेतकरी मतदारसंघात एकूण १ लाख १६ हजार ६२५ मतदारांचा समावेश आहे. 

गणनिहाय मतदार  - कळमण ६९५४, नान्नज ५९३०, पाकणी ५२५८, मार्डी ५५३१, बोरामणी १०४४०, बाळे ६४२५, हिरज ६६५०, कुंभारी ८७७६, मुस्ती ८८३६, होटगी ९९३९, कणबस ६७५८, मंद्रुप ९०७६, कंदलगाव ८८३९, भंडारकवठे ८४३९, औराद ८७७४. व्यापारी, आडते मतदारसंघात ११६९ आणि हमाल, तोलार मतदारसंघात ११०५ मतदारांचा समावेश आहे. 

आमच्या बाजार समितीचा राज्यात लौकिक आहे. शेतकºयांच्या मालाला चांगला भाव मिळावा, व्यापार वाढावा यासाठी खूप प्रयत्न केले. व्यापारी वर्गातही एक विश्वास निर्माण झाला. सोलापूर बाजार समितीची निवडणूक व्हावी, यासाठी उच्च न्यायालयात लढा सुरू होता. न्यायालयाच्या निर्देशांमुळेच निवडणूक जाहीर झाली. आमच्यावर झालेले आरोप ही आता न्यायप्रविष्ट गोष्ट आहे. न्यायालयाबद्दल आम्हाला आदर आहे. त्यामुळे याबद्दल काही बोलणार नाही. लोकांसमोर जाऊनच आम्ही आता बोलणार आहोत. - दिलीप माने, माजी सभापती. 

मूळ शेतकºयांची असलेली बाजार समिती आता शेतकºयांची उरली नाही. मूठभर लोकच तिचे मालक होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी शेतकºयांना मतदानाचा अधिकार दिला. येणाºया काळात शेतकºयांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे, शेतकºयांची फसवणूक थांबली पाहिजे यासाठी आम्ही काम करणार आहोत. शेतकरी हिताचा अजेंडा घेऊनच आम्ही निवडणूक लढविणार आहोत. - शहाजी पवार, जिल्हाध्यक्ष, भाजपा.

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीElectionनिवडणूकSubhash Deshmukhसुभाष देशमुखVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुख