शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील ३२ संस्थांकडे जिल्हा बँकेचे ८८९ कोटी अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 12:17 IST

थकबाकीदारांसाठी जिल्हा बँकेची सामोपचार परतफेड योजना, बिगरशेतीच्या बड्या ३२ कर्जदारांना घेता येईल भाग

ठळक मुद्देकर्जाची थकबाकी मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने बँक अडचणीतबड्या ३२ संस्थांकडे ८८९ कोटी ९ लाख १९ हजार रुपये बँकेचे अडकले

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेने बिगरशेती कर्ज वसुलीसाठी ‘सामोपचार परतफेड योजने’ला पुन्हा मुदतवाढ दिली असून, जिल्ह्यातील कारखाने, शैक्षणिक संस्था व अन्य थकबाकीदार संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रशासक अविनाश देशमुख यांनी केले आहे. बड्या ३२ संस्थांकडे ८८९ कोटी ९ लाख १९ हजार रुपये बँकेचे अडकले आहेत.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बिगरशेती कर्जाची थकबाकी मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने बँक अडचणीत आली आहे.  एन.पी.ए. ३९ टक्के झाल्याने  व शेतकºयांना कर्जपुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्याने नाबार्डच्या अहवालानुसार रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेच्या संचालकावर ११० कलमान्वये कारवाई केली आहे. बिगरशेतीच्या कर्जाची वसुली होण्यासाठी बँकेच्या २०१६ च्या सर्वसाधारण सभेत ‘सामोपचार परतफेड योजना’राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार थकबाकीदारांना यामध्ये भाग घेण्याचे आवाहन करण्यात आले होते; मात्र २७ पैकी एकाही थकबाकीदाराने यात सहभाग घेतला नाही. यामुळे या योजनेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली असून संस्थांना ३१ आॅक्टोबर २०१८ पर्यंत यात सहभागी होता येईल. 

रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया, राष्टÑीय बँक(नाबार्ड)यांच्याकडील एकरकमी परतफेड योजनेच्या धर्तीवर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बड्या थकबाकीदारांसाठी सवलत देणारी योजना राबवित असल्याचे प्रशासक देशमुख यांनी सांगितले. बँकेचा एन.पी.ए. कमी करण्यासाठी हा निर्णय तत्कालीन संचालक मंडळाने घेतला होता. 

संस्थाचालक पुढे येईनात...- सोलापूर जिल्हा बँकेने बिगरशेतीसाठी कार्यक्षेत्र ओलांडून औरंगाबाद, विजापूर व लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्याला कर्ज दिले असून सोलापूरसह राज्यातील अन्य ३२ संस्थांकडे ८८९ कोटी ९ लाख १९ हजार रुपये थकल्याचे सांगण्यात आले. ही थकबाकीची आकडेवारी फेब्रुवारी २०१८ अखेरची असून यामध्ये वरचेवर वाढच होत आहे.  थकबाकी वाढत असताना एकही संस्थाचालक कर्ज भरण्यासाठी पुढे येत नाही.

मागील काही वर्षांपासून शेतकºयांना नव्याने कर्ज मिळत नसल्याने शेतकरीही कर्ज भरण्यास तयार नाहीत. शेतकºयांना वेळेवर पीककर्ज देण्यासाठी बिगरशेतीच्या कर्जाची वसुली येणे आवश्यक आहे.- अविनाश देशमुख, प्रशासक, जिल्हा बँक

टॅग्स :SolapurसोलापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्र