शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘उमेद’च्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील बचत गटांना १० कोटींचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 12:56 IST

ग्रामविकास : जिल्ह्यात विणले १३ हजार ३३३ बचत गटांचे जाळे

ठळक मुद्देकेंद्र आणि राज्य शासनाचे हे दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्प जिल्ह्यातील बचत गटांना मोठ्या प्रमाणावर पतपुरवठाबचत गटातील महिलांना घरगुती वैैयक्तिक गरजांसाठी खेळते भांडवल

सोलापूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेदच्या माध्यमातून जिल्ह्यातील बचत गटांना १० कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे यांनी दिली. नवाळे म्हणाले, जिल्ह्यात आजतागायत उमेदवार अभियानाद्वारे एकूण १३ हजार ६६६ स्वयंसहायता समूहाची बांधणी झालेली आहे. ५६० ग्रामसभांची बांधणी झालेली आहे. जिल्हा परिषद स्तरावरही ३१ प्रभाग संघांची बांधणी झालेली आहे. या बचत गटांना वेळोवेळी पुस्तक लेखे, प्रगत सेंद्रिय शेती, पशुपालन, बिगरशेती उद्योग, नेतृत्व विकास यासह विविध प्रकारच्या क्षमता बांधणीचे प्रशिक्षण दिले जाते. बचत गटातील महिलांना घरगुती वैैयक्तिक गरजांसाठी खेळते भांडवल दिले जाते. यातून गटांचे भांडवलही वाढते. गेल्या तीन महिन्यांत बचत गटांना १० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. यामध्ये बिगरशेती पशुपालन करण्यासाठी ११२१ गटांना ६ कोटी ७३ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. रेशीम उद्योग, पेपर पत्रावळी, गांडूळ खत बेड, कुक्कुटपालन खवाभट्टी यासह उद्योग- व्यवसायासाठी रुपये ३० लाख ४५ हजार रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. 

उमेदचा भारुड पॅटर्न- ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून घरकूल बांधणी आणि बचत गटांचे जाळे हे विशेष कार्यक्रम राबविले जातात. केंद्र आणि राज्य शासनाचे हे दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या नियोजनामुळे सोलापूर जिल्हा या दोन्ही उपक्रमांमध्ये राज्यात आघाडीवर आहे. उमेदच्या माध्यमातून पतपुरवठा करण्यात राष्ट्रीयीकृत बँकांची मानसिकता हा मुख्य अडसर आहे. जिल्हा प्रशासनाकडे झालेल्या बैठकांमध्ये यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करण्यात आला. शिवाय ग्रामीण विकास यंत्रणेकडे नियमित आढावा घेऊन कामांना गती देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील बचत गटांना मोठ्या प्रमाणावर पतपुरवठा होऊ लागला आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयWomenमहिलाgovernment schemeसरकारी योजना