शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कामकाजाविनाच उत्तर सोलापूर तालुक्याची भ्रष्टाचार निर्मूलन समिती बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 17:51 IST

नव्याने समिती स्थापन करण्यासाठी नवे पत्र : चार महिन्यांपूर्वीच्या जिल्हाधिकाºयांच्या पत्राला मंडल अधिकारी जुमानेनात

ठळक मुद्दे नव्याने समिती स्थापन करण्याबाबतची प्रक्रिया चार महिन्यांपासून सुरूजिल्हाधिकारी कार्यालयाने भ्रष्टाचार निर्मूलन समिती स्थापन करण्याबाबत नावे सुचवावीत असे पत्र उत्तर तहसील कार्यालयाला दिले

सोलापूर : तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी स्थापन केलेली भ्रष्टाचार निर्मूलन समिती कामकाजाला सुरुवात न करताच बरखास्त झाली असून नव्याने समिती स्थापन करण्याबाबतची प्रक्रिया चार महिन्यांपासून सुरू आहे. उत्तर सोलापूर तालुक्याची ही अवस्था आहे.

तत्कालीन जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी २१ जानेवारी २०१७ रोजी एका पत्रान्वये या समितीवर मार्डी येथील विष्णू जगताप, भागाईवाडीच्या सरपंच कविता शिवाजी घोडके-पाटील, तिºहे येथील गुरुदेव गायकवाड व शेळगीचे इरय्या पुराणिक यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड केली होती. यापैकी काही सदस्यांना निवडीचे पत्र दिले तर काहींना अद्याप पत्रही दिले नाही; मात्र या समितीची अद्यापपर्यंत एकही बैठक झाली नाही.

दरम्यान, सध्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी उत्तर सोलापूर तहसीलदारांना ४ डिसेंबर २०१७ रोजीच्या पत्रान्वये भ्रष्टाचार निर्मूलन समितीवर अशासकीय सदस्य निवडण्यासाठी १५ दिवसात नावे सुचवावीत व प्रांताधिकाºयांनी संबंधित व्यक्तीचे पोलीस अहवाल पडताळून इकडील कार्यालयाला मंजुरीसाठी सादर करावे, असे म्हटले आहे. याच  पत्रात शासकीय संरक्षण दलातील सेवानिवृत्त व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, लोकांचा विश्वास संपादन  केलेली व्यक्ती, लोकप्रतिनिधी, आण्णा हजारे सुचवतील ती व्यक्ती, प्राचार्य व समाजसेवक यांचा समितीमध्ये समावेश असावा असे म्हटले आहे. 

प्रांताधिकारी कार्यालय विसरभोळे - जिल्हाधिकारी कार्यालयाने भ्रष्टाचार निर्मूलन समिती स्थापन करण्याबाबत १५ दिवसात नावे सुचवावीत असे पत्र उत्तर तहसील कार्यालयाला ४ डिसेंबर २०१७ रोजी दिले.  सोलापूर प्रांताधिकाºयांनी २४ जानेवारी रोजी या पत्राचा संदर्भ देत तब्बल ५२ दिवसांनी उत्तर तहसीलला पत्र दिले आहे. जिल्हाधिकाºयांच्या पत्राचा ५२ दिवसांनी विचार करणाºया प्रांताधिकाºयांना समिती स्थापनेसाठी नावे येण्यासाठी पाठपुरावा करण्याचा विसर पडला आहे.

मंडल अधिकाºयाचे अजब पत्र- सोलापूर मंडलाचे तत्कालीन मंडलाधिकारी अनिल शहापुरे यांनी नेहरुनगर, सोलापूर तलाठी अखत्यारित पाच विभाग, मजरेवाडी, बाळे, खेड, कोंडी, केगाव व शिवाजीनगर या भागातील शासकीय संरक्षण दलातील सेवानिवृत्त व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधींशी चर्चा केली असता एकही व्यक्ती  होकार देत नसल्याचे पत्र उत्तर तहसील कार्यालयाला दिले आहे. मार्डी व शेळगी मंडल अधिकाºयांनी अद्याप नावाच्या शिफारशीचे पत्रच दिले नाही.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय