वैरागसह राज्यातील १५ ग्रामपंचायती या नगरपंचायत करण्याची प्रक्रिया सुरू आहे़ त्यामुळे या ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया रद्द करावी असे पत्र राज्य शासनाने निवडणूक आयोगाला १८ डिसेंबर रोजी दिले आहे़ यावर आयोगाने अद्याप कोणत्याच सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेल्या नसल्यामुळे वैराग ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया देखील सुरुच असल्याचे प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी सांगितले़
बुधवारी ९६ गावांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे़
त्यानुसार वैराग व तुळशीदास नगर ग्रामपंचायतीसाठी चंद्रकांत गावडे यांची निवडणूक निर्णय अधिकारी तर सचिन शिंदे व सतीश पाटील यांची सहा़ निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे़
तसेच यापूर्वीच निवडणुकीची अधिसूचना
श्रेय घेण्याचा प्रयत्न; सोपलांचा भूमकरांना टोला
वैरागला नगरपंचायत व्हावी यासाठी यासाठी आपण पूर्वीपासून प्रयत्न केले आहेत़ त्यामुळे श्रेय घेणे हास्यास्पद असल्याची टीका सोपल यांनी भूमकरांचे नाव घेता केली.