शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्हा परिषदेच्या निलंबित कर्मचाºयांच्या पुनर्स्थापनेबाबत आयुक्तांकडे चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 14:44 IST

१६ जणांवर कारवाई: १५ कर्मचाºयांबाबत शिफारस

ठळक मुद्देझेडपीच्या तृतीय श्रेणीच्या १६ कर्मचाºयांवर अन्वेषण चौकशी किंवा फौजदारी कारवाई झाली १५ कर्मचाºयांना पुन्हा सेवेत घेण्याबाबतचा प्रस्ताव भारुड यांनी दिला

सोलापूर : विविध कारणाने निलंबित झालेल्या झेडपीच्या कर्मचाºयांना पुन्हा कामावर घेण्याबाबत विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्याकडे मंगळवारी बैठक झाली. 

या बैठकीला झेडपीचे सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांची उपस्थिती होती. झेडपीच्या तृतीय श्रेणीच्या १६ कर्मचाºयांवर अन्वेषण चौकशी किंवा फौजदारी कारवाई झाली आहे. त्यामुळे या कर्मचाºयांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या कर्मचाºयांचा निलंबनाचा एक वर्षाचा कालावधी संपला आहे. त्यामुळे निलंबन आढावा समितीपुढे विचारार्थ त्यांची प्रकरणे ठेवण्यात आली होती. या सर्व कर्मचाºयांची विभागीय चौकशी सुरू आहे. त्यात चार जणांची चौकशी पूर्ण झाली आहे. १0 कर्मचाºयांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले आहे. यातील १५ कर्मचाºयांना पुन्हा सेवेत घेण्याबाबतचा प्रस्ताव भारुड यांनी दिला आहे. 

यामध्ये लाचप्रकरणी कारवाई झालेल्या कनिष्ठ सहायक संजय बाणूर, दत्तात्रय सुतार, खंडू डोईफोडे, शामेल अडाकूल, कृषी अधिकारी बाळासाहेब बाबर, विस्तार अधिकारी विठ्ठल कोळी, कनिष्ठ अभियंता बाळासाहेब नकाते, शाखा अभियंता चिमाजी जाधवर, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक मल्लिकार्जुन मणुरे, ग्रामविकास अधिकारी भारत साळुंखे या अधिकाºयांचा समावेश आहे. तसेच विविध कारणाने निलंबित करण्यात आलेले कर्मचारी पुढीलप्रमाणे आहेत. बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळण्याचा हक्कभंग केल्याप्रकरणी उपशिक्षक विश्वनाथ मोगल, असभ्य वर्तनप्रकरणी सदानंद पोतदार यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या कामकाजात अनियमितता व परस्पर बँकेत खाते उघडल्याप्रकरणी ग्रामसेवक पांडुरंग गुंड तर अन्य कारणासाठी दत्तात्रय ढवळे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. खासगी सावकारी केल्याप्रकरणी आरोग्यसेविका बेबीनंदा इचगे यांना निलंबित करण्यात आले आहे. 

समिती घेणार निर्णयविभागीय आयुक्तांच्या कार्यालयात निलंबन आढावा समितीची बैठक मंगळवारी झाली. या बैठकीला सोलापूरबरोबरच पुणे विभागातील झेडपीचे अधिकारी उपस्थित होते. झेडपीचे सीईओ डॉ. भारुड यांनी समितीपुढे हा अहवाल सादर केला. समितीच्या शिफारशीवर आता पुढील कार्यवाही होणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद