आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १३ : थकीत वीजबिलांचा भरणा न करणाºया बारामती परिमंडलातील १४ हजारांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा ५ कोटी २७ लाखांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची महावितरणची धडक मोहीम तीव्र करण्यात आली आहे. गेल्या ५ दिवसांत ही कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी व रविवारी सुटीच्या दिवशीसुद्धा ही मोहीम राबविण्यात आली. वीजबिलांच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्यास महावितरणला आर्थिक प्रश्नांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरमहा वीजबिलांसह वीज ग्राहकांकडे असलेल्या थकबाकीची वसुली करण्यासाठी महावितरणने मंगळवारपासून धडक मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार बारामती परिमंडलातील बारामती, सातारा व सोलापूर या तिन्ही मंडलांत थकीत वीजबिलांच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र झाली आहे. यात वारंवार आवाहन करूनही थकीत वीजबिल न भरणाºया १४ हजार ७६३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा गेल्या ५ दिवसांत खंडित करण्यात आला आहे. या ग्राहकांकडे ५ कोटी २७ लाख रुपये थकीत आहेत. लघुदाब घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांविरुद्ध सुरु असलेल्या धडक कारवाईत (कंसात थकबाकी) बारामती मंडल - ४,२७१ (२ कोटी १३ लाख), सातारा मंडल - २,६५१ (६६ लाख), तर सोलापूर मंडलात ७,८४१ ग्राहकांचा (२ कोटी ४८ लाख) वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजपुरवठा खंडित करण्याची थकबाकीदारांनी कटू कारवाई व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकीत देयकांचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. वीजबिलांबाबत ग्राहकांच्या तक्रारी असल्यास त्याचे त्वरित निराकरण करण्यात येणार आहे. थकीत वीजबिलांचा भरणा करण्यासाठी स्थानिक वीजबिल भरणा केंद्रासह व घरबसल्या आॅनलाईन पेमेंटसाठी महावितरणची वेबसाईट तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपचा पर्याय उपलब्ध आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील १४ हजारांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित, महावितरणची मोहीम : ५.२७ कोटी थकबाकीपोटी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 16:50 IST
थकीत वीजबिलांचा भरणा न करणाºया बारामती परिमंडलातील १४ हजारांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा ५ कोटी २७ लाखांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील १४ हजारांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित, महावितरणची मोहीम : ५.२७ कोटी थकबाकीपोटी कारवाई
ठळक मुद्देथकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची महावितरणची धडक मोहीम तीव्रवीजपुरवठा खंडित करण्याची थकबाकीदारांनी कटू कारवाईमहावितरणने मंगळवारपासून धडक मोहीम राबविण्यास सुरुवात केली