शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

अपंग हक्क कायद्याची अंमलबजावणी हवी

By admin | Updated: June 22, 2014 00:42 IST

बच्चू कडू : जिल्हास्तरीय अपंग व्यक्तींचा मेळावा

करमाळा : अपंग व्यक्ती शासनाच्या उदासीन धोरणामुळे दुर्लक्षित असून, अपंग हक्क संरक्षण कायद्याची राज्य शासनाने प्रभावी अंमलबजावणी करावी अन्यथा अपंगांचे राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल, असा आ. बच्चू कडू यांनी सांगितले़प्रहार अपंग क्रांती आंदोलन यांच्यावतीने आज करमाळ्यातील विकी मंगल कार्यालयात सोलापूर जिल्हास्तरीय अपंग व्यक्तींचा मेळावा संस्थापक अध्यक्ष आ.बच्चू कडू यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष धर्मेंद्र सातव, राज्य समन्वयक अभय पवार, मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल, माजी नगराध्यक्षा पुष्पाताई फंड, पुणे जिल्हाध्यक्षा रेखा ढवळे, नाशिक जिल्हाध्यक्षा संध्या जाधव, संपर्क प्रमुख ज्ञानेश्वर म्हेत्रे, सोलापूर जिल्हाध्यक्ष पिंटू भोसले, महिला जिल्हाध्यक्षा अ‍ॅड. सुनीता देवी, तालुका महिला अध्यक्षा मीना राखुंडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अ‍ॅड. बाबुराव हिरडे, पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस उपस्थित होते. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बबन आरणे यांनी केले. यावेळी बोलताना आ.बच्चू कडू म्हणाले, अपंगांना समाजात सन्मानाने जगण्यासाठी शासकीय नोकऱ्यातील अनुशेष भरणे गरजेचे आहे. अपंगांना उदरनिर्वाह भत्ता ४ हजार रुपये दिला पाहिजे. अपंगांना व्यवसायासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका यांनी विना डिपॉझिट दुकान गाळे दिले पाहिजेत. अपंगांना घरकूल योजनेत समाविष्ट करत असताना दारिद्र्यरेषेची अट नसावी अशी मागणी त्यांनी भाषणातून केली.प्रारंभी आ. बच्चू कडू यांनी शहरातील फंड गल्ली येथे प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या करमाळा शाखा कार्यालय व नामफलकाचे उद्घाटन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंनिसचे कार्यवाह व्ही.आर गायकवाड यांनी केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे तालुकाध्यक्ष बबन आरणे, शहराध्यक्ष समीर बागवान, प्रदीप देवी, अशोक पठाण, भरमशेट्टी यांनी परिश्रम घेतले. मेळाव्यास जिल्हाभरातून शेकडो अपंग उपस्थित होते.